कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचं जाणवतंय; रविंद्र धंगेकरांच्या आरोपांनंतर स्वत: मोहोळां


पुणे: पुण्यात सध्या महायुतीतील दोन पक्षातील धुसफूस दिसून येत असल्याची चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकरांनी (ravindra dhangekar) पुण्यातील जैन बोर्डींगच्या जमीन घोटाळ्यावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती निशाणा साधला. त्यांनी मोहोळ यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप केला आहे. धंगेकरांच्या (ravindra dhangekar) आरोपांवरती मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिलं होतं, मात्र तरीदेखील धंगेकरांनी आरोपांचं सत्र सुरूच ठेवलं, त्याचबरोबर त्यांचा एक व्हिडीओ देखील पोस्ट केला होता. त्यानंतर आता मुरलीधर मोहोळ (murlidhar mohol) यांनी माध्यमांशी बोलताना या सर्व आरोपांवरती उत्तर देताना म्हटलं की, एकच माणूस आहे, त्यावर ती बोलायचं मी सोडून दिलं आहे. मी त्या दिवशी सगळं स्पष्टीकरण दिलं आहे असंही ते म्हणालेत.(ravindra dhangekar)

Murlidhar Mohol : मी स्पष्टीकरण दिलं आहे पुन्हा त्याच्यावरती

या शहरातलं वातावरण बिघडणारी जी मंडळी आहेत त्यांची बाईट नक्की घ्या पण त्यांच्याकडचे पुरावे आधी तपासा. पुरावे घ्या आणि त्यांच्या मुलाखती करा. उठायचं आणि काहीही आरोप करायचे असं चालत नाही. हे व्यक्तिगत सुरू आहे. विधानसभा, लोकसभा निवडणूक हरलेल्या वैफल्यग्रस्त माणसाकडून हे सुरू आहे. मी स्पष्टीकरण दिलं आहे पुन्हा त्याच्यावरती बोलू नये असं मला वाटतं, असंही मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.

Murlidhar Mohol : विशाल गोखले हा माझा मित्र होता आहे आणि राहणार

त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ यांनी गोखलेंच्या एका मोठ्या इमारतीच्या बांधकामाची माहिती देणारा व्हिडिओ केला होता, त्या इमारतीची माहिती त्यांनी सांगितली होती, तो व्हिडीओ देखील धंगेकरांनी पोस्ट केला होता, आणि म्हटलं होतं की,“कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचं जाणवतं, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे”, त्यावर स्पष्टीकरण देताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, विशाल गोखले हा माझा मित्र होता आहे आणि राहणार आहे. पाच वर्षांपूर्वी मी तो व्हिडिओ बनवला होता. जुना व्हिडिओ काढला आणि त्यात सांगितलं की मी जाहिरात करत आहे. तो कालचा व्हिडिओ नाही. या प्रकरणातील सत्यता तपासा. काल कुणीतरी एका दुकानाची जाहिरात करत होतं मग त्याच्यात ते पार्टनर झाले का? या शहराची राजकीय संस्कृती आहे कुणी कुणाची जाहिरात केली तर काय व्यवसायात भागीदार होतं का? या शहराची एक राजकीय संस्कृती आहे. एक माणूस या संस्कृतीची वाट लावत आहे”, अशा शब्दांत मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

ravindra dhangekar : पोस्टमध्ये धंगेकर काय म्हणाले होते?

“कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचं जाणवतं, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे. तसेही ५० टक्के भागीदार म्हणजे कंपनीचा निम्मा मालक असतो. उगीच मंत्रीपदाच्या नियमामुळे मंत्रीपद मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी जड अंतकरणाने हे कंपनीतून बाहेर पडले. बरं खरंच बाहेर पडले की फक्त कागदोपत्री बाहेर पडलेत हे देव जाणे. कारण यांचे ५० टक्क्यांचे शेअर्स कुणाला दिलेत याच्याबद्दल कोणतीच माहिती यांनी दाखवलेली नाही. त्यामुळे कंपनीच्या भविष्यातील ३०,००० कोटींच्या फायद्याच्या प्रोजेक्टमध्ये यांची इन्व्हॉलमेंट नसणार का? काय वाटतं? खुशाल पुणेकरांना वेड्यात काढताय?”, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.