ओव्हरटेक कारणं जिवावर बेतलं, मालवाहू वाहनाची ट्रकला जोरदार धडक; भाषण अपघाता तिघांचा मृत्यू

नागपूर अपघात बातम्या: नागपूर जिल्ह्यातून भाषण अपघाताची घटना समोर आली आहे. यात मालवाहू वाहनाला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिलीय. ही धडक इतकी जोरदार होती की या भीषण अपघातात (Accident News) तिघांचा मृत्यू झालाय. नागपूर जिल्ह्यातील काटोल रोडवर ही घटना घडली आहे. काल (4 मे 2025) संध्याकाळी झालेल्या या अपघातातील मृतांची नावे रोशन टेकाम, रमेश देहनकर आणि रामकृष्ण मसराम अशी असल्याची माहिती पुढे आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पुढील कारवाई सुरू केली. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ओव्हरटेक कारणं जिवावर बेतलं,  भाषण अपघाता तिघांचा जागीच मृत्यू

पुढे आलेल्या माहितीनुसार, अपघात झालेले मालवाहू चार चाकी वाहन काल संध्याकाळी कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत कृषी उपज पोहोचून परत काटोलच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, एका वाहनाला ओव्हरटेक करताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व तो थेट समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकला. या अपघातात मालवाहू वाहनात बसलेल्या तिघांचा मृत्यू झालाय. अपघात एवढा भीषण होता की घटनेच्या वेळेला त्या ठिकाणातून जात असलेल्या काही दुचाकी चालकांनाही त्याची झळ बसली आणि दुचाकी चालक ही जखमी झाले.

हळदीच्या कार्यक्रमात राडा,दोन बालक जखमी

दुसरीकडे, नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील सैलाब नगरमध्ये लग्नपूर्वी हळदीच्या जेवणात झालेल्या हाणामारीत दोन बालक जखमी झाल्याची घटना घडली आहे. दारूच्या नशेत काहींनी हळदीच्या जेवणात गोंधळ घातल्यानंतर झालेल्या हाणामारीच्या वेळेला ही घटना घडली. या घटनेत जखमी झालेल्या काव्यांश पिल्ले आणि सानिया पिल्ले या दोन बालकांना कामठी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेत प्रकारणाची चौकशी केली. दरम्यान, या प्रकरणी आता तिघांना अटक केली आहे.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.