प्रियकराने विवाहित महिलेला गळा दाबून संपवलं, मृतदेहाशी शारीरिक संबंध; नागपूरमधील धक्कादायक घटना

नागपूर: नागपूर हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपीने मृतदेहावरही बलात्कार केल्याची माहिती. विवाहित प्रेयसीने शारीरिक संबंधास (Sexual relations) नकार दिल्यामुळे प्रियकराने तिचा गळा आवळून खून (Nagpur Murder) केला. त्यानंतर तिच्या मृतदेहावर बलात्कार (Rape) केला. महिलेची मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर हे अमानवीय कृत्य उघडकीस आले. या प्रकरणात पोलिसांनी रोहित गणेश टेकाम या आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय विवाहित महिला ही हुडकेश्वर खुर्दमध्ये राहायची. ती मूळची मध्यप्रदेशची असून कामाच्या शोधात सहा वर्षांपूर्वी पतीसह नागपुरात आली होती. तिचा पती सकाळी ढाब्यावर कामाला गेल्यानंतर थेट मध्यरात्री एक वाजता घरी येतो. तिला दारुचे व्यसन होते. रोहित टेकाम हा बांधकाम मिस्त्री असून दोन वर्षांपूर्वी तो हुडकेश्वर खुर्द येथील एका इमारतीच्या बांधकामावर होता. तेव्हाच संजना आणि रोहितची ओळख झाली. या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पती घरी नसताना रोहित नेहमी तिला भेटायला येत होता. गुरुवारी पती कामावर गेल्यानंतर संजनाने रोहितला घरी बोलावले. तो महालगाव कापसीवरुन काम सोडून तिच्या घरी आला. तिने दारुची बाटली आणण्यास सांगितले. दोघांनी दारु ढोसली आणि जेवण केले. नंतर रोहितने संजनाकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने त्याला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या रोहितने तिला ‘मला घरी कशाला बोलावले मग?’ असा प्रश्न केला. त्यानंतर दारुच्या नशेत त्याने तिला मारहाण केली. तरीही तिने संबंधासाठी नकार दिला. शेवटी रोहितने तिच्याच ओढणीच्या साहाय्याने तिचा गळा आवळला आणि खून केला. त्यावरही त्याचे समाधान झाले नाही. त्याने संजनाच्या मृतदेहावर बलात्कार केला आणि पळ काढला. सायंकाळी मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

हुडकेश्वर पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. वैद्यकीय अहवालातून मृतदेहावार बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. संजनाच्या मोबाईलवरील कॉल रेकॉर्डिंगवरुन पोलिसांनी रोहितला अटक केली आहे.

पोलीस काय म्हणाले?

6 फेब्रुवारीला हुडकेश्वर परिसरात एक महिला घरात मृतावस्थेत सापडल्याची घटना घडली होती. सदर माहितीवरुन आम्ही घटनास्थळी गेलो असता मृत महिलेच्या कानातून रक्त निघाल्याचे दिसले. बाकी तिच्या शरीरावर कुठलीही जखम नव्हती. त्यामुळे आम्ही पंचनामा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शनिवारी हा शवविच्छेदन अहवाला मिळाला. यामध्ये महिलेचा गळा आवळून खून झाल्याचे आणि तिच्यावर अत्याचार झाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार आम्ही हत्येचा गुन्हा दाखल करुन तांत्रिक विश्लेषण करुन 25 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आम्ही पुढचा तपास करत आहोत. या तरुणाने गुन्हा कसा केला, त्याला कोणी मदत केली का, त्याबाबत आम्ही सखोल तपास करत आहोत. या आरोपीला न्यायालयात हजर करुन त्याची पोलीस कोठडी घेण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा

भांडणाचा राग मनात ठेवत झोपेतच दगड घालून हत्या, रक्तबंबाळ अवस्थेत पाहून परिसर हादरला, मुंबईतील घटना

अधिक पाहा..

Comments are closed.