12 वी पेपरफुटी प्रकरण! नागपूर पोलिसांकडून ट्युशन क्लासशी संबधीत आणखी दोन जणांना अटक

नागपूर क्राईम न्यूज : बारावीच्या पेपरफुटी प्रकरणात नागपूर पोलिसांकडून आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मनीष शंभरकर व संदीप सरडकर या दोघांना अटक करण्यात आली असून हे ट्युशन क्लासशी संबंधित आहेत. आज दिवसभरात एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सकाळी ट्युशन क्लास संचालक दिनेश कोटांगले व शिक्षक प्रदीप जांगडे यांना अटक करण्यात आली होती. प्रदीप जांगडे याने अटकेतील दिनेश कोटांगले याला whataap वर पेपर पाठवला होता.

दिनेश कोटांगले याने तो पेपर एक्ससेलेन्ट ट्युशन क्लासेस चे संचालक मुस्तफा खान याला पाठवला होता. या प्रकणात आतापर्यंत एकूण नऊ  आरोपींचा थेट सहभाग आढळला असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे 18 फेब्रुवारीला सेंट उर्सुला हायस्कूल परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकामुळे  पेपर फुटीचा प्रकार उघड आला होता, रसायनशास्त्राच्या पेपरच्या वेळेपूर्वीच XII नावाच्या  व्हॉट्सअॅप ग्रुप वर प्रश्नपत्रिका आली होती. प्रसाधनगृहात गेलेल्या विद्यार्थिनीवर संशय झडतीत स्मार्टफोन जप्त करण्यात आला आहे. मोबाईलमध्ये परीक्षा सुरू होण्यापूर्वीच 10.37 ला पेपर, प्रश्नांसोबत उत्तरेही ग्रुपवर उपलब्ध होती. ‘XII’ नावाच्या 21 सदस्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर, निशिकांत मूलच्या क्रमांकावरून पेपर पाठवला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतरही गणिताचा पेपर लीक

16 फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि 18 तारखेला भौतिकशास्त्राचा पेपर फुटल्याचे उघड झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान अटकेतील आरोपींनी आपले मोबाईल फॉरमॅट केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, पोलिसांनी डिलिट केलेला डेटा पुन्हा रिकव्हर केला असता 21 फेब्रुवारीला गणिताचा तिसरा पेपरही प्रसारित झाल्याचे डिजिटल पुरावे समोर आले. विशेष म्हणजे, सेंट उर्सुला शाळेतील एका विद्यार्थिनीच्या मोबाईलवरून 16 फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि 18 फेब्रुवारीला भौतिकशास्त्राचा पेपर प्रसारित झाल्याचे आधीच उघड झाले होते. आता गणिताचा पेपरही त्याच साखळीतून बाहेर गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

आणखी वाचा

Comments are closed.