झोपडीत आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकलीला अलगद उचललं; अंधारात नेत प्राणांनी शरीराचे लचके तोडले
नागपूर क्राईम न्यूज : नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील नरसाळा परिसरातुन एक अतिशय धक्कादेणारा आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यात परिसरातील स्मशानभूमीजवळील नाल्याच्या मागे असलेल्या मजुरांच्या झोपडपट्टीत अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत चिमुकलीचे नाव अनुष्का रवी मेळा असून ती मूळची मध्यप्रदेशातील सेलमिया येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. हे घटना 26 डिसेंबरच्या मध्यरात्री सुमारे 2 वाजताच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
नागपूर क्राईम न्यूज : प्राण्याने शरीराचे लचके तोडले, छाती व दोन्ही हात खाल्ले
मिळालेल्या माहितीनुसारघरात मुलगी दिसून न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, परिसरातf आणि छिन्नविछिन्न अवस्थेत चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. अंदाजे 6 ते 8 महिन्यांची ही चिमुकली आईच्या कुशीत झोपडीत झोपलेली असताना अज्ञात प्राण्याने तिला उचलून नेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तर अज्ञात प्राण्याने शरीराचे लचके तोडले असून छाती व दोन्ही हात खाल्ल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नागपूर गुन्हे: परिसरात मोठ्या प्रमाणात अंधार असल्याने घटना घडल्याची माहिती
दरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात अंधार असल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तर नेमका हल्ला कोणत्या प्राण्याने केला, याचा शोध अद्याप सुरू आहे. ठेकेदाराच्या कामासाठी बाहेरगावाहून आलेले मजूर कुटुंबासह या झोपडपट्टीत वास्तव्यास असताना हि कार्यक्रम घडली. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून मजूर कुटुंबांमध्ये दहशत पसरली आहे. तर आता सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित होते आहे.
आणखी वाचा
Comments are closed.