लग्नाच्या वादातून प्रियकरावर चाकूने हल्ला; त्यानेच सगळं केल्याचा बनाव, मोबाईलही फॉर्मेट केला अन


नागपूर : नागपूरच्या नंदनवन कॉलनीत भाड्याने राहणारा बालाजी कल्याणे हा 28 वर्षीय तरुण त्याच्या खोलीत संशयास्पदरित्या (Nagpur Crime News) मृतावस्थेत आढळून आला होता, तर तेथेच त्याची मैत्रीण देखील रक्तबंबाळ (Nagpur Crime News) अवस्थेत आढळली होती. त्यामुळे हा हत्येचा प्रकार आहे की आत्महत्येचा, यासंदर्भात पोलीसांनी सखोल तपास सुरू केला होता. मृत बालाजी कल्याणे पोलीस भरतीची तयारी करत होता, तर त्याची मैत्रीण बीएएमएसची विद्यार्थिनी आहे. दोघे एकमेकांचे नातेवाईक होते आणि दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री होती अशी माहिती समोर आली आहे.(Nagpur Crime News) या घटनेबाबत पोलिस तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

Nagpur Crime News: तिच्यावर अद्यापही रूग्णालयात उपचार सुरू

प्रेयसीनेच प्रियकर बालाजी कल्याणे (वय २४, मुदखेड, नांदेड) याची हत्या केल्याची बाब स्पष्ट झाली आहे. पोलिसांनी अखेर मध्यरात्रीनंतर या प्रकरणात बीएएमएसची इंटर्नशिप करणाऱ्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिच्यावर अद्यापही रूग्णालयात उपचार सुरू आहेत. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती.

Nagpur Crime News: दोघांमध्येही चार वर्षांपासून प्रेमप्रकरण

मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी कल्याणे (वय २४, मुदखेड, नांदेड) असे मृताचे नाव आहे, तर रती साहेबराव देशमुख (२५, करंजी, नांदेड) असे आरोपी प्रेयसीचे नाव आहे. रती बीएएमएसची विद्यार्थिनी असून, ती इंटर्नशिप करीत होती, तर बालाजी पोलिस भरतीची तयारी करीत होता. ही दोघांमध्येही चार वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. रती अनेकदा त्याच्या खोलीवर जायची. बुधवारी रात्री ती बालाजीकडे गेली. त्यांचा लग्न करण्याचा विचार होता. मात्र, रतीच्या कुटुंबीयांचा लग्नाला विरोध होता. त्यामुळे बालाजी अगोदरच तणावात होता. त्याच मुद्द्यावरून गुरुवारी रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास त्यांचा वाद झाला.

Nagpur Crime News: तिच्यावर हल्ला केला व नंतर स्वतःला मारून घेतल्याची बतावणी

रतीने तेथील चाकू उचलून बालाजीच्या अंगावर पूर्ण ताकदीनिशी वार केले. त्यात तो रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला. त्याला त्या अवस्थेत पाहून ती घाबरली व तिने देखील स्वतःवर वार करून घेतले. सुरुवातीला तिने बालाजीनेच तिच्यावर हल्ला केला व नंतर स्वतःला मारून घेतल्याची बतावणी केली. मात्र, बालाजीच्या अंगावर खोलवर घाव होते व त्यातून पोलिसांचा संशय बळावला. तिची चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. बालाजीचा भाऊ शिवाजी ऊर्फ ऋषीकेश विनायकराव कल्याणे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी रतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Nagpur Crime News: आरोपी रतीने तिचा मोबाईल फॉर्मेट केल्याची माहिती

बालाजीने या घटनेच्या एक दिवस आधी अल्टिमेटम दिल्याची माहिती आहे. जर लग्न झाले नाही तर माझ्या मरणासाठीच तुम्हाला नागपूरला यावे लागेल असे त्याने रतीच्या वडिलांना त्याने म्हटलं होतं. बालाजीच्या मोबाइलच्या तपासणीत पोलिसांना हे उघड झाले. आरोपी रतीने तिचा मोबाईल फॉर्मेट केल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.