मुलीच्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नासाठी मध्य प्रदेशातून नागपुरात आले; पुन्हा नीट परीक्षा देण्याच
नागपूर : देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी खळबळ उडाली, त्यानंतर आता ‘नीट’ पेपरफुटीमुळे तणावात गेलेल्या एका हुशार विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं आहे. मूळची मध्य प्रदेशातील असलेली ही विद्यार्थिनी (Nagpur Crime News) नागपुरात राहून वैद्यकीय प्रवेशाची तयारी करत होती. तिची परीक्षा देखील खूप चांगली गेली होती. मात्र, एनटीएच्या कारभारामुळे आणि पेपरफुटीमुळे परत एकदा परीक्षा देण्याची वेळ आली यामुळे ती मुलगी मानसिकदृष्ट्या खचली होती. त्यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले. तिच्या आत्महत्येला (Nagpur Crime News) दोन आठवडे उलटून गेल्यानंतर पालकांना तिने लिहलेली ‘सुसाईड नोट’ सापडली व त्यातून तिच्या आत्महत्येमागील कारण समोर आले. या नीट पेपर फुटीप्रकरणाचे देशभरात पडसाद उमटले आहेत.(Nagpur Crime News)
Nagpur Crime News: सुसाईट नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय?
आई, बाबा… तुमचा माझ्यावर विश्वास होता की माझी मुलगी शिकून डॉक्टरकडे जाईल. पण पुन्हा NEET देण्याचे धाडस माझ्यात नाही. पूर्वी मला NEET च्या पेपरमध्ये चांगले गुण मिळत होते. पण आता पुन्हा पेपर चांगला होईल याची काय शाश्वती? माफ करा आई, बाबा… मी तुम्हा दोघांसाठी सर्व काही उध्वस्त केले.
दिवसरात्र एक करून अभ्यास केला होता, मात्र पेपरफुटीचा प्रकार घडला व पूर्णपणे कोलमडली. आकांक्षा उर्फ स्नेहा कृष्णकुमार चतुर्वेदी (१९) असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे. ती मूळची मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यातील मनगिया गावातील रहिवासी होती. तिचे वडील शेतकरी आहेत. आकांक्षा लहानपणापासूनच हुशार होती व डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न होतं. ती डॉक्टर बनण्यासाठी मेहनतही घेत होती. तिच्या वडिलांनी कर्ज काढले व ते तिला नागपूरला शिक्षणासाठी पपाठवलं. त्यांनी एका नामांकित कोचिंग क्लासमध्ये तिचा प्रवेश घेतला. तिला त्रास होऊ नये म्हणून ते संपूर्ण कुटुंबासोबत नागपुरातच आले. अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडी परिसरातील अजयनगर येथे ते राहत होते.(Nagpur Crime News) आकांक्षाने दिवसरात्र एक करून अभ्यास केला व तिची ‘नीट’ची परीक्षा देखील चांगली गेली होती. निकालाची प्रतीक्षा करत असतानाच पेपरफुटीचा प्रकार घडला व ती पुरती खचली. तेव्हापासून ती तणावात होती. यातूनच २० मे रोजी तिने अजयनगर येथील घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण तेव्हा समोर आले नव्हते. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
आणखी वाचा
Comments are closed.