शॅम्पूच्या बाटल्यांमधून कोकेनची तस्करी, राजधानी एक्सप्रेसमधून 4 कोटीं 26 लाखांचे कोकेन जप्त

नागपूर क्राईम न्यूज : राजधानी एक्सप्रेसमधून 4 कोटीं 26 लाखांचे कोकेन जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. औषधाच्या 50 कॅप्सूलमध्ये लपवून तस्करी केली जात होती. या प्रकरणी डीआरआयने धडक कारवाई केली आहे. अमली पदार्थ तस्करीसाठी गुन्हेगार आता किती कुटील मार्ग अवलंबत आहेत, याचा धक्कादायक नमुना नागपुरात समोर आला आहे.

शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये कोकेनचे कॅप्सूल लपवून तस्करी

शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये  कोकेनचे कॅप्सूल लपवून तस्करी केली जात होती. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूर युनिट हजरत निजामुद्दीन ते बंगळुरु जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमध्ये कारवाई करत कोकेनच्या तस्करीच्या भांडाफोड केला आहे. यात डीआरआय पथकाने तब्बल 4 कोटी 26 लाख किमतीचे 853 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.