खाकी वर्दीची मग्रुरी! बिअर शॉपीच्या फलकाचा वाद अन् पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण, दुकानदारावर आल

नागपूर बातम्या : नागपुरात एका पोलीस कर्मचाऱ्याने (Nagpur Police) दुकानदाराला केलेल्या मारहाणीत दुकानदाराची ऐकण्याची शक्ती कमी होऊन त्याला बहिरेपण आल्याची घटना घडली आहे. मनीष गिरी असे पीडित दुकानदाराचे नाव असून त्याचे हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत वानाडोंगरी परिसरात पायल जनरल स्टोअर आणि कॅफेचे दुकान आहे. मनीष गिरी यांच्या दुकानाच्या वरती मनीष भोसले या पोलीस कर्मचाऱ्याने नुकतंच बिअर शॉपी सुरू केली. मात्र,13 जून रोजी बिअर शॉपीचा बोर्ड थेट मनीष गिरी यांच्या पायल जनरल स्टोअरच्या समोर लावला. बिअर शॉपीच्या फलकामुळे जनरल स्टोअरमध्ये नियमित येणाऱ्या महिला आणि विद्यार्थी येणार नाही. बिअर शॉपीचा बोर्ड तुमच्या दुकानासमोर लावा, असे गिरी याने सांगितल्यानंतर पोलीस कर्मचारी मनीष भोसलेने गिरी यांच्या कानशिलात लगावून दिली.

Nagpur News : सातत्याने कानात शिट्टी वाजण्याचा आवाज; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटून तक्रार, पण कारवाई नाही!

दरम्यानगिरी यांच्या कानावर जोरात प्रहार झाल्यामुळे त्यांच्या ऐकण्याची शक्ती कमी झाली असून त्यांना बहिरेपण आला आहे. सातत्याने कानात शिट्टी वाजण्याचा आवाज त्यांना ऐकू येतोहे. अनेक दिवस हा त्रास असल्याने त्यांनी नुकतंच सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर गिरी यांची ऐकण्याची शक्ती कमी झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. एका राग पोलीसवाल्याच्या हल्ल्यामुळे आपले कायमचे शारीरिक नुकसान झाल्याचे समोर आल्यानंतर गिरी यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटून मनीष भोसले या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कृत्याची माहिती दिली. दरम्यानपोलिसांनी सर्व प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मात्र अद्यापही मनीष भोसले या आरोपी कर्मचाऱ्या विरोधात कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता पोलीस प्रशासन पुढे नेमकं काय कारवाई करतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Nagpur Crime : ‘मार्वेल-एआय’ने उलगडला अत्याचार-हत्येचा गुन्हा

नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी परिसरातील निर्जन ठिकाणी 28 जून रोजी 60 ते 70 वर्षे वयोगटातील एका अनोळखी वृद्ध महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने तिची ओळख पटविणे शक्य नव्हते. शवविच्छेदन अहवालात महिलेवर अत्यंत क्रूरपणे लैंगिक अत्याचार करून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. अशातच पोलिसांनी ‘मार्वेल-एआय’च्या साहाय्याने मृत महिलेचा विद्रूप झालेला चेहरा डिजिटल पद्धतीने वास्तवदर्शी स्वरूपात पुन्हा तयार केलाहे. हा फोटो सर्व पोलीस ठाण्यांना आणि सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. त्यानंतर समाजसेवक विनोद भिंगोरे यांनी ही महिला घटना घडण्याच्या आदल्या दिवशी खापरखेडा परिसरात पाहिल्याची माहिती दिली. या धाग्यावरून पोलिसांनी महिलेची ओळख निश्चित केली आणि सीसीटीव्हीच्या पुढील तपासातून आरोपी सुधाकर मंडपेपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश मिळाले. ही कारवाई गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर झाल्याचे महत्त्वपूर्ण उदाहरण मानली जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.