4 वर्षांचे प्रेम अन् लग्नाला घरच्यांचा नकार; मोकळ्या मैदानात जाऊन प्रेमीयुगुलाने घेतला तो निर्ण
नागपूर क्राईम न्यूज : नागपूरच्या वानाडोंगरी परिसरात प्रेमसंबंधाचा अत्यंत दुर्दैवी शेवट समोर आला आहे. लग्नाला दोन्ही कुटुंबीयांनी विरोध केल्याने निराश झालेल्या प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्येचा (Nagpur Crime News) प्रयत्न केला. उपचारादरम्यान २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू (Nagpur Crime News) झाला असून तरुणीची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृत तरुणाचे नावे २१ वर्षीय विशाल जावडे असे आहे. विशाल हा मंडप डेकोरेशनचे काम करत होता तसेच ऑटो रिक्षाही चालवत होता. गेल्या चार वर्षांपासून (Nagpur Crime News) त्याचे त्याच परिसरात राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनाही विवाह करायचा होता आणि त्यांनी आपल्या कुटुंबीयांसमोर ही इच्छा व्यक्त केली होती. मात्र, दोन्ही कुटुंबीयांनी या विवाहाला विरोध केल्याचे सांगितले जात आहे.(Nagpur Crime News)
रविवारी या मुद्द्यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला. त्यानंतर सोमवारी दुपारी दोघेही वानाडोंगरी ते संगम गाव मार्गावरील एका मोकळ्या मैदानात गेले आणि सोबत आणलेले विषारी द्रव्य प्राशन केले. विषाचे प्रमाण जास्त असल्याने विशालची प्रकृती घटनास्थळीच गंभीर झाली. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी दोघांना तातडीने शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल केले. मात्र, रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान विशालचा मृत्यू झाला. तरुणीची प्रकृती अद्याप गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.(Nagpur Crime News)
Nagpur Crime News: नेमकं प्रकरण काय?
एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या प्रेमीयुगुलाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. घरच्यांच्या संमतीनेच लग्न समारंभ उरकू, असा विचार करून त्यांनी आपापल्या कुटुंबीयांना आपला निर्णय सांगितला. मात्र, दोन्ही कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाला कडाडून विरोध केला. यामुळे नैराश्य आल्याने प्रेमीयुगुलाने विष प्राशन केले. त्यात तरुणाचा मृत्यू झाला, तर तरुणी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. विशाल विलास जावडे (२१, रा. वानाडोंगरी) असे मृत प्रेमवीराचे नाव आहे. शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने वानाडोंगरी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.(Nagpur Crime News)
विशाल मंडप सजावटीचे काम करतानाच ऑटो-रिक्षा चालवायचा. वानाडोंगरी परिसरातील तरुणी (वय २०) सोबत त्याचे चार वर्षापासून प्रेमसंबंध होते. त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पळून जाऊन लग्न करण्याऐवजी आपल्या कुटुंबीयांचा मान राखत लग्नाचा आनंदोत्सव करू, असा विचार दोघांनी केला. तशी कल्पना या दोघांनी आपापल्या कुटुंबीयांना दिली. मात्र, दोन्ही कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नालाच नव्हे तर प्रेमसंबंधालाही विरोध दर्शविला. रविवारी या मुद्द्यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे या दोघांना प्रचंड नैराश्य आले.
Nagpur Crime News: सोबत जगू शकणार नाही, म्हणून टोकाचा निर्णय !
सोबत जगू शकणार नाही, अशी कल्पना आल्याने त्यांनी सोबत मरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, सोमवारी दुपारी हे प्रेमीयुगुल वानाडोंगरी-संगम गाव मार्गावरील मोकळ्या मैदानात जाऊन विष घेतले. काही वेळेतच दोघांची प्रकृती बिघडल्याचे पाहून नागरिकांनी त्यांना तातडीने शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रात्री ११ च्या सुमारास विशालचा मृत्यू झाला. तरुणीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.
Nagpur Crime News: दोघांची जोड कायमची तुटली
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या. विशालचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन्ही कुटुंबीयांच्या अट्टहासापोटीच या प्रेमीयुगुलाची जोडी कायमची तुटल्याचीही चर्चा आहे.
Comments are closed.