खळबळजनक! नागपूरच्या काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त, भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाला अटक
नागपूर क्राईम न्यूज : नागपूर पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कारवाईला पुन्हा एकादा यश आले आहे. नागपूरच्या काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त करण्यात आला असून एनडीपीएस पथक व काटोल पोलिसांni हि संयुक्त धडक कारवाई केली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये अमली पदार्थविरोधी पथक (एनडीपीएस सेल) आणि काटोल पोलिसांनी संयुक्त रित्या केलील्या कारवाईत तब्बल 34 किलो गांजा जप्त करून सह जणांना अटक करण्यात आली आहे.
Nagpur Crime News : एनडीपीएस पथक व काटोल पोलिसांची संयुक्त धडक कारवाई
दरम्यानधंतोली येथील श्रीकांत देवते यांनी किरायाने घेतलेल्या घरातील एक रूम आरोपीनां नारळ व्यवसायाचा माल ठेवण्याकरिता दिली होती. या रूममध्ये आरोपी अधुमधून राहत होते. त्यांनी नारळ विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे भासवून त्याच ठिकाणी गांजाचा साठा व पुरवठा चालवला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी मध्यरात्री समीर, सचिन व छगन हे तिघेही खोलीत असल्याची माहिती मिळताच पहाटे पोलिसांनी घात लावून रेड केली आणि सर्वांना ताब्यात घेतले.
Nagpur Crime : आणखी काही पुरवठादार जाळ्यात अडकण्याची शक्यता, 17 लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त
मिळालेल्या माहितीनुसार, या करवैत M.H 40 DC 0093 क्रमांक 1093 क्रमांकाची बुलेटकेअप (किंमत 10 लाख), मोबाईल 45 हजार, गांजा 6 लाख 72 हजार असा एकूण 17 लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींकडून गांजा बल्लंगीर (ओडिसा) येथून आणला असुन नेमका कोणाकडून आणला याचा तपास एनडीपीएस सेल पथक व काटोल पोलीस असून आणखी काही पुरवठादार जाळ्यात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात असुन यात कोण कोण सहभागी आहेत याचा कसून शोध सुरु आहे.
Crime News : भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाला अटक
दरम्यान, या कारवाईतील मुख्य आरोपी समीर राऊत हा नरखेड तालुक्यात शेर भगतसिंग या नावाने सामाजिक संघटना चालवीत होता. त्याचे पुढील पाऊल हे राजकीय होते. यामुळे नरखेड तालुक्यातील मोठ्या संख्येने 20 ते 25 वयोगटातील युवा त्याला जोडल्या गेले होते. अशात त्याची अमली पदार्थ विक्रीत असलेला सहभाग हा तरुणकरतो अतिशय जोखमेचा असल्याचे बोलले जात आहे. गांजा विक्रीमध्ये काटोल ग्रामीण मंडळ भाजप युवा मोर्चा अध्यक्ष तथा सरपंच (डोर्ली भांडवलकर) वैभव दिलीप काळे 28 या युवा पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने चर्चेला उधाण आले आहे. सर्व आरोपी हे 22 ते 28 वर्ष वयोगटातील असल्याने हे रॅकेट आणखी किती मोठे आहे? त्याची नावच्या लिंक कसे लागेल आणि यात आणखी कोणी पदाधिकारी आहेत च्या? याचा शोध सुरु आहे.
Nagpur : राजकीय वर्तुळात खळबळ
मुख्य आरोपी समीर विजयराव राउ, सचिन भागतवत झोड वय. 22 वर्षे धंदा- मजुरी रा.डोर्ली भांडवलकर ता. काटोल जि. नागपूर, आ.क्र. 3) छगन प्रितम चरपे वय. 23 वर्षे धंदा- मजुरी रा. दातेवाडी ता. नरखेड जि. नागपूर, आ.क्र.4) सुरज बाबाराव सुपटकर वय. 25 वर्षे रा. दातेवाडी ता. नरखेड 5) विशाल देविदास शंभरकर वय. 23 वर्षे रा. मेंढला ता. नरखेड जि. नागपूर आ.क्र. 6) वैभव दिलीपराव काळे वय. 28 वर्षे धंदा-समाजसेवा रा.डोर्ली भांजवलकर ता. काटोल अशी अटक करण्यात आलेल्या सहा आरोपिंची नावे आहेत. तर वाहन चालक गज्जू नामक युवक फरार असुन काटोल पोलीस मागावर आहे. या विरोधात एन डी पी एस कायदा कलम 8 (क), 29 एन डी पी एस ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.