विशेष यादी तयार! अमली पदार्थाच्या तस्करीत गुंतलेल्या गुन्हेगारांच्या संपत्तीवर हतोडा, पोलीस आयु
नागपूर क्राईम न्यूज : नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल (Police Commissioner Ravindra Singal) यांनी नागपुरातून बदली होऊन जाता जाता अमली पदार्थाचे तस्कर आणि सातत्याने अमली पदार्थांच्या खरेदी विक्री (Drug Trafficking) गुन्हे करणाऱ्या काही सराईत गुन्हेगारांची एक यादी तयार करणे सुरू केले असून लवकरच ती महापालिकेला सोपवली जाणार आहे. एनडीपीएस कायद्याच्या तरतुदीनुसार अमली पदार्थाच्या व्यापारातून या गुन्हेगारांनी कमावलेल्या पैशातून निर्माण केलेल्या संपत्तीला महापालिकेने जमीनदोस्त करावी, अशी अपेक्षा रवींद्र सिंगल यांनी मनपाकडून व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त नागपूर सोडून जाता जाता अमली पदार्थाच्या सराईत गुन्हेगारांना चांगला धडा शिकवून जात असल्याची चर्चा सध्या नागपूरत आहे.
Nagpur Crime Ravindra Singal : काय आहे रवींद्र सिंगल यांची योजना?
– अमली पदार्थांचा प्रसार रोखण्यासाठी जे कायदे अमलात आहेत, त्यामध्ये अमली पदार्थांच्या व्यापारातून निर्माण केलेल्या संपत्तीला demolish करण्याची तरतूद आहे.
– कायद्यानुसार पोलिसांनी सातत्याने अमली पदार्थाच्या व्यापारात गुंतलेल्या गुन्हेगारांची यादी महापालिका दिली तर महापालिकेला त्या गुन्हेगारांच्या अमली पदार्थापासून मिळवलेल्या संपत्तीला नष्ट करता येते.
-याच तरतुदीचा वापर करत नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी नागपुरात सातत्याने आमली पदार्थाच्या व्यापारात गुंतलेल्या गुन्हेगारांची यादी बनवली आहे.
-लवकरच यादी महापालिकेला सोपवि जाईल.
-अमली पदार्थाच्या विक्री करण्याच्या उद्दिष्टाने वारंवार अमली पदार्थांची तस्करी करणारे गुन्हेगारांचे नाव त्या यादीत असणार आहे.
– महापालिकेने अशा गुन्हेगारांनी अमली पदार्थांच्या विक्रीतून जमवलेल्या संपत्तीला जमीनदोस्त (dimolish) करण्याची अपेक्षा पोलिसांना आहे.
Nagpur Crime News : वन्यजीव तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या नागपूर प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश कारवाई केली आहे. 24 आणि 25 जून रोजी आंध्र प्रदेशातील श्रीकाकूलम जिल्ह्यात हि मोठी कारवाई करण्यात आली आहे. श्रीकाकूलम आणि रायाकुर्डी या दुर्गम गावातून पिंजऱ्यात डांबून ठेवलेले 4 शेकरू,1 भारतीय तारा कासव, 14 रानकोंबड्या आणि उदमांजराची 2 पिल्ले सुरक्षितरित्या जप्त करण्यात आले आहे. जप्तींनंतर एका संशयित आरोपीसह सर्व वन्यजीवांना पुढील कारवाईसाठी श्रीकाकूलम वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. विदेशी पाळीव प्राण्याची मागणी आणि वन्यजीव संग्राहकामुळे ही तस्करी होत असून नागरिकांनी अशा गुन्ह्याची माहिती सुरक्षा यंत्रणा द्यावी, असे आवाहन डीआरआयने केले आहे.
इतर महत्त्वच्या बातम्या
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Comments are closed.