नागपुरात अल्पवयीन मुलांचा पराक्रम, एक दोन नव्हे तर डझनभर सायकली चोरल्या
नागपूर क्राइम न्यूज: नागपुरात (Nagpur) चमचमीत पदार्थांची स्वतःची हौस पूर्ण करण्यासाठी 7 ते 12 वयोगटातील अल्पवयीन मुलांच्या एका टोळक्याचे पराक्रम पाहून नागपूर पोलिसही चक्रावले आहेत. कारण 7 ते 12 वर्षांच्या मुलांनी एक दोन नव्हे तर तब्बल डझनभर सायकल चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मुलांकडून 10 सायकली जप्त केल्या आहेत.
कसं आलं प्रकरण उजेडात?
वाहन चोरीच्या शेकडो घटनांबद्दल आपण ऐकत, वाचत असतो. मात्र नागपुरात सायकल चोरीची एक अफलातून घटना घडली आहे. बेलतरोडी, अजनी आणि हुडकेश्वर या भागातून मोठ्या संख्येने लहान मुलांच्या सायकली चोरी होत असताना पोलिसांनी सायकल चोरीच्या घटनांवर लक्ष केंद्रित केलं. तेव्हा अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अवघ्या 7 ते 12 वर्षांच्या काही मुलांनी अनेक सायकलची चोरी करुन त्या विकण्याचा सपाटा लावल्याचे समोर आले आहे. ही मुलं ट्युशन क्लासेस, शाळा, बाजार किंवा गृहनिर्माण संकुलच्या समोर उभ्या असलेल्या सायकलींची रेकी करायचे. त्यानंतर संधी साधून चोरी करायचे. पोलिसांनी त्यांच्याकडून 10 सायकली जप्त केल्या आहेत. ही शाळकरी मुलं हॉटेलमध्ये जाऊन आवडीचे चमचमीत पदार्थ खाण्यासाठी सायकल चोरी करत होते. आता निरागस वयात चोरी करायला लागलेल्या या मुलांना योग्य मार्गावर आणण्यासाठी पोलिसांनी विशेष कौन्सलिंग सुरू केली आहे.. तसेच या मुलांच्या पालक तसेच शिक्षकांनाही घटनेची माहिती दिली आहे.
चोरीच्या घटनांमध्ये वाढ
दरम्यान, नागपुरमधील अल्पवयीन मुलांच्या टोळक्याचा पराक्रम बघून पोलिस देखील चक्रावले आहेत. हॉटेलमधील पदार्थांची चव घेण्यासाठी ही अल्पवयीन मुले सायकलची चोरी करत होते. या मुलांनी तब्बल 12 सायकलची चोरी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी या सर्व मुलांना ताब्यात घेतलं आहे. तसेच त्यांच्याकडून 10 सायकली देखील जप्त केल्या आहेत. या मुलांना योग्य मार्गावर आणण्यासाठी पोलिसांनी विशेष कौन्सलिंग सुरु करण्यात आले आहे. तसेच शिक्षकांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विशेषत: नागपुरमध्ये देखील चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन देखील सतर्क आहे. पण अनेक भागात चोरीच्या घटना घडताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Malad : चोरी करण्यासाठी महिला आणि मुलींची कपडे घालायचा, पोलिसही चक्रावले; 41 लाखांचे दागिने अन् मुद्देमाल जप्त
आणखी वाचा
Comments are closed.