शिक्षकाच्या फोनमध्ये महिलांचे वॉशरूममधील अन् अंघोळीचे व्हिडिओ! पोलिसांकडून अटक; चौकशीवेळी म्हणा
नागपूर: नागपुरातून एक संतापजनक घटना (Nagpur Crime News) समोर आली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहात महिलेचे चोरून व्हिडिओ काढणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे चित्रकला विद्यालयाचा हा शिक्षक यापूर्वीही अशाच कृत्यासाठी अटक (Nagpur Crime News) झाला होता. नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यांतर्गत महिलांच्या स्वच्छतागृहात लपून महिलांचे व्हिडीओ काढणाऱ्या विकृत मानसिकतेच्या शिक्षकाला पोलिसांनी (Nagpur Crime News)अटक केली आहे. मंगेश खापरे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तो नागपूरच्या दिघोरी परिसरात एका खाजगी शाळेत कला (चित्रकला) शिक्षक म्हणून कार्यरत होता. (Nagpur Crime News)
नेमकं काय घडलं?
घटनेच्या दिवशी आरोपी शिक्षक सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघ संकुलात एका कार्यक्रमासाठी गेला होता. एक महिला स्वच्छतागृहात गेल्यावर मंगेशने खिडकीतून तिचे व्हिडिओ काढले. महिलेला स्वच्छतागृहातून बाहेर येताना खिडकीतून कोणीतरी मोबाईल घेऊन फोटो काढल्याचा संशय आल्यानंतर तिने बाहेर येऊ आरडाओरड केली. यावेळी पीडित महिलेचा पती आणि इतर उपस्थित नागरिकांनी .या नराधम आरोपी शिक्षकाला पकडले. त्यावेळी आरोपी शिक्षकचा मोबाईल तपासला असता त्यात पीडित महिलेचे स्वच्छतागृहातील व्हिडिओ आढळून आले.
आरोपी शिक्षकाच्या मोबाईल मधून यापूर्वीचे काही महिलांचे स्वच्छतागृहातील तर काहींची आंघोळ करतानाचे आणखी काही व्हिडिओ आढळून आले आहेत. या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला. सीताबर्डी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. याआधीही मंगेशने अशाच पद्धतीने स्वच्छतागृहात गेलेल्या महिलेचे व्हिडिओ काढले होते, तेव्हा त्याला अंबाझरी पोलीस स्टेशन मध्ये अटक करण्यात आली होती.
पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (रविवारी, ता 2) सीताबर्डी येथे एका महिलेने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली होती. विदर्भ साहित्य मंडळ या ठिकाणी एका सत्संगच्या कार्यक्रमाला आपल्या परिवारासह आल्या होत्या. गाडीतून उतरल्यानंतर त्यांना वॉशरूमला जायचं असल्याने त्यांनी तळमजल्यावरील वॉशरूम चा वापर करण्यासाठी त्या गेलेल्या होत्या. या वेळेला वॉशरूम मधून उठल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की खिडकीतून कोणीतरी त्यांचा व्हिडिओ काढत आहे, निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पटकन बाहेर येऊन आरडाओरडा केला. त्यावेळी बाहेर थांबलेले महिलेचे पती बाहेर आले आणि त्यांनी त्या ईसमाला पकडलं. त्याचा मोबाईल चेक केला त्यामध्ये त्या महिलेचा व्हिडिओ दिसून आला. त्याचबरोबर त्यांनी तत्काळ सीताबर्डी पोलीस स्टेशनला संपर्क साधून त्या ईसमाला ताब्यात देऊन त्याच्या विरुद्ध माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी सदर महिलेचा विनयभंग केल्याचं आणि चित्रीकरण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपी हा मंगेश विनायक खापरे हा राहणार नागपूर येथील असून तो एका खाजगी शाळेमध्ये चित्रकलेचे शिक्षकाचे काम करतो. या इसमाचा रेकॉर्ड काढल्यानंतर यापूर्वी देखील अंबाझरी पोलीस स्टेशन मध्ये असेच प्रकारे महिलांचे वॉशरूम मधील व्हिडिओ काढल्या संबंधीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्यावेळी देखील त्याला अटक करण्यात आलेली होती. त्या इसमाकडे चौकशी केली असता त्याने आपल्या पत्नीसोबत कौटुंबिक वाद आहेत. पत्नी माहेरी गेल्यानंतर तो स्वतःला खूप एकट वाटून घेतो. म्हणून तो अशा प्रकारचे कृत्य करतो, असं त्यांनी सांगितलं आहे. तो थोडा विकृत मानसिक स्वभावाचा असल्याचा दिसून येतोय. त्याच्या मोबाईलमध्ये अशाच प्रकारचे अन्य दोन महिलांचे वॉशरूममधील आणि आंघोळ करताना काढलेले दोन-तीन व्हिडिओ समोर आलेले आहेत, परंतु त्याबद्दल जास्त काही माहिती नाही. त्यानी ते व्हिडिओ कुठे काढलेत त्याची तो माहिती देत नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.