नागपुरात मुलं चोरणारी टोळी सक्रिय, अफवांचा पेव; गैरसमजुतीतून वृद्ध महिलेला लाथाबुक्क्यांनी मारल
नागपूर बातम्या : नागपूर शहारत मुलं चोरणारी टोळी सक्रिय असल्याच्या सोशल मीडियावरील (Social Media) खोट्या आणि तथ्यहीन अफवामुळे (Rumors) शहरात एका वृद्ध महिलेचा जीव जाताजाता थोडक्यात बचावला आहे. यात जमावाकडून होत असलेल्या बेदम मारहाणीतून (Nagpur Crime News) पोलिसांनी कसंतरी या वृद्धापकाळातची सुखरूप सुटका केलीय. हिंगणा पोलीस स्टेशनचे हद्दीत इसासनी परिसरात राहणाऱ्या एक साठ वर्षीय महिलेसोबत हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसारसाठ वर्षीय स्त्री या त्यांच्या नेहमीचं औषध घेण्यासाठी रुग्णालयात गेल्या होत्या. औषध घेऊन घरी परत येत असताना दुपारी थकवा आल्याने तसेच रोजची औषध घेण्याची वेळ झाल्यामुळे औषध खाण्यासाठी थांबल्या. त्यावेळी त्यांनी जवळील घरासमोर खेळणाऱ्या एका लहान मुलाकडे पिण्यासाठी पाणी मागितले. मात्र, मराठी आणि हिंदी भाषा नीट येत नसल्यामुळे भोजपुरी बोलणाऱ्या वृद्ध महिलेला आपली बाजू नीट मांडता आली नाही.
Nagpur Crime News : बॅगमध्ये टाकून अपहरण करण्याचा प्रयत्न? वृद्ध महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण
दरम्यान, त्याच ठिकाणी असलेल्या एका दुसऱ्या महिलेनं आरडाओरड करत साठ वर्षीय वृद्ध महिला तिच्या लहान मुलीला एका बॅगमध्ये टाकून अपहरण करण्याचा प्रयत्न करत होती, असा खोटा आरोप केला आणि जोरदार गोंधळ घातला. मराठी आणि हिंदी नीट बोलता येत नसल्यामुळे भोजपुरी भाषिक ती वृद्ध महिला आपला बचाव करू शकली नाही आणि आरोप करणाऱ्या महिलेने त्या वृद्ध महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करणे सुरू केले. त्या ठिकाणी उपस्थित लोकांचाही गैरसमज झाला आणि वृद्ध महिला खरोखरच लहान मुलीचा अपहरण करण्याचा प्रयत्न करत होती, असे समजून गर्दीतील काही लोकांनीही तिला मारहाण करण्यास प्रोत्साहन दिले.
Nagpur News : मुलांना चोरणारी टोळी सक्रिय असल्याचे खोटे आणि तथ्यहीन अपप्रचार
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत साठ वर्षीय वृद्ध महिलेची सुटका करत तिला सुरक्षित पोलीस स्टेशनमध्ये नेले. पोलीस स्टेशनमध्ये वृद्ध महिलेच्या मुलाला आणि सुनेला बोलावण्यात आले आणि सर्व प्रकार उघडकीस आला. दरम्यान नागपूरात गेले काही दिवस लहान मुलांना चोरणारी टोळी सक्रिय असल्याचे खोटे आणि तथ्यहीन अपप्रचार सोशल मीडियावर सुरू आहे आणि त्यामुळेच आज औषध खाण्यासाठी पाणी मागणाऱ्या एका वृद्ध महिलेला मुलं चोरणाऱ्या टोळीतील सदस्य समजून बेदम मारहाण करण्यात आली. त्यामध्ये त्या वृद्धेचा जीव जाता जाता वाचला. 2012 मध्ये अशाच पद्धतीने नागपूरच्या कळमना भागात नाथजोगी समाजातील तिघांना जमावाने मुलं चोरणाऱ्या टोळीचे सदस्य समजून बेदम मारहाण केली होती आणि त्यामध्ये तिघांचा जीव गेला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.