नागपुरातील भीषण स्फोट प्रकरणाच्या तपास अहवालातून धक्कादायक खुलासा; पोलीसांकडून 11 आरोपींना अटक
नागपूर एसबीएल कंपनीचा स्फोट : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे 1 मार्च 2026 रोजी सकाळच्या सुमारास एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये मोठा स्फोट (Nagpur SBL Company Blast) झाला होता. या स्फोटात्यामुळे आतापर्यंत 19 निष्पाप कामगारांचा नाहक बळी गेला आहे. अशातच या प्रकरणाचा चौकशीत्यामुळे आता धक्कादायक सत्य समोर आलं आहे. एसबीएल कंपनीकडून (SBL Company Blast) सरकारी नियमांना केराची टोपली दाखवत सुरक्षा नियमाचे थेट उल्लंघन करण्यात आल्याची धक्कादायक बाब तपास अहवालातून समोर आली आहे. पेसो (PESO) (पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन) आणि डिश (डायक्टोरेट ऑफ इंडस्ट्रीयल सेफ्टी अँड हेल्थ) कडून प्राथमिक अहवालात कंपनीवर नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय.
Nagpur SBL Company Blast: पेसो आणि डिशच्या पथकाने आवश्यक सुधारणा करण्यास सूचना दिल्या होत्या, पण…
दरम्यानकंपनीने नोनल क्रिंपिंग युनिटमध्ये प्रक्रिया झालेल्या स्फोटकांना तातडीने दुसऱ्या इमारतीत न हलवता तेथेच साठा केला होता. त्यामुळे अपघात होताच संपूर्ण इमारत उडाली. पेसो आणि डिशच्या पथकाने 21 जून 2024 रोजी एसबीएल कंपनीला भेट देत सुरक्षा तपासणी केली होती. त्यावेळी अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. पथकाने एसबीएल कंपनीला आवश्यक सुधारणा करण्यास सूचना केल्या, मात्र कंपनीने दुर्लक्ष केले. जर त्यावेळी कंपनीने पावले उचलली असती तर 19 कामगाraanनाही आज कदाचित जीव गमवावा लागला नसता.
पेसो आणि डिश च्या तपास अहवालातील मुद्दे –
-आग लागल्यानंतर नियंत्रण आणण्यासाठी फायर ट्रेलर पंप कंपनीत नेमण्यात आलेला नव्हता.
– नियमानुसार दोन सुरक्षा अधिकारी तैनात करणे आवश्यक होते. मात्र केवळ एक सुरक्षा अधिकारी तैनात करण्यात आले होते.
– सोबत कंपनीत आरोग्य अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली नव्हती.
– डिश-च्या कार्यालयात कामगाराच्या सुट्ट्या आणि वेतनाचे तपशील सादर करण्यात आले नव्हते.
– फ्लेमप्रूफ सीसीटीव्ही कॅमेरे कंपनीत लावण्यात आले नव्हते.
– अंतर्गत सुरक्षा ऑडिट ‘डिश’ कार्यालयाला सादरच करण्यात आले नव्हते.
– 809 कर्मचाऱ्यांपैकी केवळ 183 जणांसाठीच फेब्रुवारी 2025 मध्ये आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
– ‘डिश’च्या कार्यालयाकडे कामगारांच्या प्रशिक्षणाचे कुठलेही तपशील सादर करण्यात आले नव्हते.
Nagpur Police : पोलीसांकडून 11 आरोपींना अटक, कंपनी मालक अद्याप फरारच!
एसबीएल आयुध कारखाना स्फोट प्रकरणात पोलीसांकडून 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे कंपनीचा मालक आलोक चौधरी हा अद्याप फरार आहे. पोलीसांच्या तीन पथकांकडून अलोक चौधरीचा शोध सुरु आहे. या प्रकरणात आतापर्यंत 19 कामगारांचं मृत्यू झाला असून 22 कामगार गंभीर जखमी आहे. त्यात 12 जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.