Nagpur SBL Company Blast : एसबीएल एनर्जी स्फोट प्रकरणी मालकासह संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत 1 मार्च 2026 रोजी झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या आणखी एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 19 वर पोहोचली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, कंपनीचे मालक संजय चौधरी यांच्यासह 21 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कळमेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 105 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी या कंपनीत डेटोनेटर आणि इतर स्फोटके तयार करण्याचे काम सुरू असताना अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर लागलेल्या भीषण आगीमुळे बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

नागपूरच्या दारूगोळा निर्मिती कारखान्यात स्फोट; 18 ठार

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये कंपनीचे मालक, संचालकासह प्रोजेक्ट मॅनेजर, प्लांट हेड, सुपरवायझर आणि सेफ्टी ऑफिसर अशा 21 जणांचा समावेश आहे. यापैकी नऊ जणांना पोलिसांनी रात्रभरात केलेल्या कारवाईत अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

Comments are closed.