बिअर बारमधील त्या फाईल्स सरकारी, अधिकाऱ्यांनी रिचवले ग्लास; पोलिसांकडे सीसीटीव्ही, कसून तपासणी

नागपूर – एखाद्या सरकारी कार्यालयात दारु पिणे किंवा पार्ट्या करण्याचा प्रकार अनेकदा उघडकीस आला आहे. अनेकदा सोशल मीडियावर सरकारी कार्यालयातच अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी पार्ट्या झोडल्याचे व्हिडिओही व्हायरल (Viral) झाले होते. मात्र, आता चक्क एका बारमध्ये अधिकारी सरकारी फाईली घेऊन बसल्याचं पाहायला मिळत आहे. नागपूर (Nagpur) शहरातील एका परमीट व बिअर बारमध्ये शासकीय फाईल घेऊन तीन व्यक्ती बसून चर्चा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल होता. याप्रकरणी, पोलिसांनी (Police) चौकशी सुरू केली असून या फाईल्स सरकारी कार्यालयातीलच असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.

शहरातील मनीष नगर भागात असलेल्या कीर्ती बारमध्ये हा प्रकार घडल्याचे पुढे आले. दुपारच्या सुमारासचा कीर्ती बारमधला हा व्हिडिओ असल्याचा दुजोरा नागपूर पोलिसांनी दिला आहे. या बारमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून वरिष्ठ पातळीवर याची चौकशी सुरु असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तीन व्यक्ती बसलेले दिसतात, त्यातील एक जण दारुचे घोट घेत शासकीय फायलींवर पडताळताना व्हिडीओमध्ये दिसून येतो. सरकारी कार्यालयातील शासनाच्या फायलींचा गठ्ठा घेऊन बारमध्ये बसलेले  ‘हे’ अधिकारी कोण होते, ‘ते’ कोणत्या विभागाचे होते आणि ‘त्यांनी’ कोणत्या महत्त्वाच्या फायलींवर बारमध्ये येऊन दारूचा घोट घेत पडताळणी किंवा चर्चा करत होते, याबद्दल प्रचंड गोपनीयता बाळगली जात आहे. या प्रकारचा तपास पूर्ण झाल्यानंतर गुन्हा दाखल होण्याची शकता वरिष्ठ सूत्रांनी वर्तवली आहे.

महिला अधिकाऱ्याची धाब्यावर ओली पार्टी

यवतमाळ जिल्ह्यातही अशाच प्रकारची घटना घडली होती, नेर येथील एमएससीबीच्या कार्यालयातील महिला अधिकारी वसुलीसाठी गेल्या असता ऑन ड्युटी धाब्यावर ओली पार्टी केल्याचे समोर आले आहे. यावेळी महिला कर्मचारी मद्यप्राशन करून अर्वाच्च भाषेचा वापर करीत आहे. इतकेच नव्हे तर आपल्या चार ते पाच कनिष्ठ कर्मचाऱ्यांसमोर मालखेडीतील अभियंता यांना घासही भरवीत आहे. हा व्हिडिओ सध्या जिल्ह्यात सोशल मीडियावर गावातील एका ग्राहकाने व्हायरल केला आहे. जिल्ह्यात या महिला कर्मचाऱ्याचा व्हिडीओ चांगलाच वायरल होत आहे.

हेही वाचा

22 मेपासून ट्रेस, सिग्नल मिळताच ठोकलं; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना कसं घेरलं?, अमित शाहांनी सगळं सांगितलं!

आणखी वाचा

Comments are closed.