नागपुरात गुंडांनी पिच्चरटाईप बार फोडला; रॉड अन् काठ्यांनी मॅनेजरला मारले, ग्राहक सैरावैरा पळाले
नागपूर : राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या नागपूरमधील (Nagpur) गुन्हेगारीचा विषय चर्चेत असून पोलिसांपुढे (Police) आव्हान उभ असल्याचं पाहायला मिळतआहे. कालच नागपूरमध्ये एका बसवर चक्क कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर, आज एका रेस्टॉरंट बारमधील व्हिडिओ फुटेज समोर आलं असून चक्क गुंडांनी सिनेस्टाईल हल्ला केल्याचं दिसून येतं. शहरातील प्रतापनगर पोलीस स्टेशन अंतर्गत उर्वशी बार मध्ये गुंडांनी तोडफोड केल्याची ही घटना आहे. या घटनेमुळे शहरातील इतर हॉटेल व्यवसायिकांमध्ये भीती पसरली असून पोलिसांचा धाक उरला की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
येथील बारमध्ये गुरुवार काल रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास अचानक काही गुंड हातात धारदार शस्त्र, लोखंडी रॉड आणि लाठ्या काठ्या घेऊन उर्वशी बारमध्ये घुसले. तेव्हा बारमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होती, मात्र अचानक झालेल्या गुंडांच्या या हल्ल्यामुळे ग्राहक सैरावैरा पळू लागले. सर्व ग्राहक पळून गेल्यानंतर या गुंडांनी लाथा बुक्क्यांनी आणि हातातल्या शस्त्रांनी बारमध्ये उभ्या असलेल्या मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली. मिळालेल्या माहितीप्रमाणे गुंडांची हीच टोळी दोन दिवसांपूर्वी बारमध्ये जेवण करुन आणि मध्य प्राशन करून केली होती. तेव्हा बार मालकाने बिलाची मागणी केल्यावर हे गावगुंड बिलाचे पैसे द्यायला तयार नव्हते. त्यामुळे देखील परवा वाद झाला होता. त्याच वादाचा सूड घेण्यासाठी गावगुंडांची ही टोळी काल आणखी गुंडांना सोबत घेऊन बारमध्ये घुसली आणि अशा पद्धतीने तोडफोड करत कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या हल्ल्यामध्ये बारच्या मॅनेजरसह काही कर्मचारी जखमी झाले आहे. मात्र, अशाप्रकारे हातात शस्त्र घेऊन गुंड एखाद्या बारची, तोडफोड करत असतील तर पोलिसांचा धाक उरला नसल्याची चर्चा शहरात होत आहे.
महापालिकेच्या बसवर हल्ला
नागपूरच्या लकडगंज पोलीस स्टेशनजवळ महानगरपालिकेच्या “आपली बस”वर हातोडीने दोन अज्ञाताने हल्ला केल्याचा दावा बस चालकाने केला. गुरुवारी संध्याकाळी आठ वाजताच्या सुमारास बस वर्धमान नगर वरून लकडगंजच्या दिशेने जात असताना लकडगंज पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर ऍक्टिवावर आलेल्या दोघांनी आधी बसच्या समोरील काचेवर आणि त्यानंतर बाजूच्या खिडकीच्या काचेवर हल्ला केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.