भाजप हा पूर्ण जातीवादी पक्ष, त्यांना  जातीजातीमध्ये तुकडे करायचेत, नाना पटोलेंचा हल्लाबोल


नाना पॅटोल: भाजप हा पूर्ण जातीवादी पक्ष आहे. भाजपला जातीजातीमध्ये तुकडे करायचे आहेत असं म्हणत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली. या लोकांनी धर्माचं विष इतकं मोठं  पेरलेलं आहे की, जे आज सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर जोडा फेकून मारायचं कृत्य होत आहे. यापेक्षा या देशाचं अजून कोणतं दुर्भाग्य असेल असे पटोले म्हणाले.

देशाचे सरन्यायाधीशांवर ज्या पद्धतीने भ्याड कृत्य केलं जातं. यावेळेस केंद्रातलं आणि दिल्लीतलं बसलेलं सरकार काय करते आहे. त्या व्यक्तीच्या विरोधात अजूनही गुन्हा दाखल केलेला नाही. प्रधानमंत्री असतील, मोहन भागवत असतील आणि भाजपचे वरिष्ठ नेते असतील त्यांना चुप्पीच साधायची आहे, कारण की, हे कृत्य त्यांच्या माध्यमातूनच झालेलं असल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि भाजपवर केला आहे.

महायुतीचं सरकार हे बेईमानींनं निवडून आलेलं सरकार

महायुतीचं सरकार हे बेईमानींनं निवडून आलेलं आहे, हे जनतेच्या मताने निवडून आलेलं सरकार नाही, असा आरोप पटोले यांनी केला आहे. निवडणुकीदरम्यान या सरकारने त्यांचा जाहीरनामा काढला होता. त्याचं सरकार आल्यावर कर्जमाफी करण्याचं जाहीर केलं होतं. नाद कुणाला लागला होता. मग शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचा अधिकार या लोकांना कुणी दिला असे पटोले म्हणाले. शेतकऱ्यांना सत्तेतून बाहेर काढायला लागलेलेच आहेत. भाजप आणि महायुती हे दोघेही शेतकरी विरोधी आहेत. याला वेगळं प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करणारं राज्य आहे. त्यामुळं राज्यात शेतकऱ्यांवर किती अत्याचार होत आहे. त्यामुळं हे शेतकरी विरोधी लोक आहेत. शेतकऱ्यांना मदत करू शकत नाही, तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठही चोळू नका असे पटोले म्हणाले.

लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचं आहे, तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो असे वक्तव्य राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं आहे. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी जो जाहिरनामा दिला होता. त्यात महायुतीचं सरकार राज्यात सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, असं वचन दिलं होतं.  मग शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली तर त्याला नाद म्हणायचा का? असा प्रश्न उपस्थित करीत, शेतकऱ्यांना मदत करू शकत नसाल तर, त्यांच्या जखमेवरही मीठ चोळू नका. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करणारं राज्य आहे, अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर केली.

नेमकं काय म्हणाले होते बाबासाहेब पाटील?

लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचं आहे, तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो. लोकांनी ठरवलं पाहिजे आपल्याला काय मागायचंय.  एखाद्या गावात निवडणुकीच्या काळात अनिल भाईदाससारखा माणूस गेला , लोकांनी सांगितलं आमच्या गावात नदी आणून देईल त्याला आम्ही मतदान करणार. त्याने काय मागावं ठरवावं ना.. अनिल भाईदास म्हणाले, नदीही देऊन टाकू.. म्हणून म्हणतो मागणाऱ्यांनी काय मागावं हे ठरवावं..निवडणुकी आम्हाला निवडून यायचंय म्हणून आम्हीही देखील आश्वासने देतो. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला हवा.

आणखी वाचा

Comments are closed.