महाराष्ट्राची तिजोरी लुटण्याचा अधिकार संविधानाने दिलाय का? जनतेचे नोकर आहात, मालकासारखं बोलू नक


नाना पटोले अजित पवारांवर माझ्या हातात राज्य सरकारची तिजोरी आहे. त्यामुळं माझ्या घड्याळाच्या पाठीशी उभा राहिलात, तर बारामतीसारखं काम तुमच्याकडे करु शकतो, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नळदुर्ग नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत केले. यावर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी (Nana Patole) अजित पवारांसह भाजपवर सडकून टीका केली आहे. संविधानाने तुम्हाला तिजोरी लुटण्याचा अधिकार दिलाय का? सत्ताधाऱ्यांनी तिजोरीचे तुकडे केलेत का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय. विकासाच्या नावावर मतदान मागा भ्रष्टाचाराला खतपाणी घालू नका. तुम्ही जनतेचे नोकर आहात, पाच वर्षासाठी सत्ता तुमच्या हातात आहे. मालकासारखं बोलू नका. महाराष्ट्राची जनताचं तुमचा गर्व चूर करेल, अशी टीका देखील नाना पटोले यांनी अजित पवार यांच्यासह सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

नाना पटोले म्हणाले की, अर्थमंत्री असलं म्हणजे काय झालं? राज्याची सगळी तिजोरी तेच लुटून नेऊ शकतात आणि त्यांनाच सगळे अधिकार संविधानानं दिले असे नाही. मतदान मागत असताना विकासाच्या नावानं मागा ना. विकास काय… विकासात भ्रष्टाचाराची जास्त साथ आहे. विकासाचं नाममात्र चित्र तिथं दिसत आहे. एकीकडे फडणवीस येऊन सांगतात की, मी मुख्यमंत्री आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे सांगतात की मी उपमुख्यमंत्री आहे. या लोकांनी महाराष्ट्राच्या तिजोरीचे तुकडे करून टाकलेत का?  असे त्यांनी म्हटले.

Nana Patole on Ajit Pawar: तुम्हाला सत्तेतून काढण्याचाही अधिकार जनतेलाच

नाना पटोले पुढे म्हणाले की, त्यांनी अगोदर डोक्यातून काढलं पाहिजे की, तुम्ही मालक नाही. तुम्ही जनतेचे नोकर आहात. पाच वर्षासाठी तुम्हाला त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. याचा अर्थ तुम्ही मालकासारखं बोलू नका. जनता तुम्हाला मालक बनवत असेल, असं तुम्हाला वाटत असेल तर, तुम्हाला सत्तेतून काढण्याचाही अधिकार जनतेलाच आहे. हे जे वक्तव्य आहे ते सत्तेचा गर्व झालेला आहे, असं वाटत आहे. म्हणून या पद्धतीचं वक्तव्य ते करतात आहेत. महाराष्ट्राची जनता त्यांचा हा गर्व चूर केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका त्यांनी अजित पवारांवर केली आहे.

Nana Patole on Chandrashekhar Bawankule: भाजपला सत्तेचा माज : नाना पटोले

दरम्यान, मी भाजपचा स्टार प्रचारक आहे, कितीही खर्च होऊ द्या. निवडणूक आयोगाला जे उत्तर द्यायचे ते देऊ, असं विधान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. यावर नाना पटोलेंनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. भाजपला सत्तेचा माज आणि घमंड आलाय. सत्तेच्या भरोशावर त्यांनी पैसे जमवले आणि त्यांचा हा घमंड नगरपालिका निवडणुकीत जनताच उतरवेल, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

आणखी वाचा

Umesh Patil on Rajan Patil: विरोधात आवाज उठवला म्हणूनच तुमच्या शिवसैनिकाला संपवलं, उमेश पाटलांचा शिंदेंसमोरच राजन पाटलांवर गंभीर आरोप; एकनाथ शिंदे म्हणाले…

आणखी वाचा

Comments are closed.