तीन तिघाडा, काम बिघाडा! मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मंत्रीच पाळत नाहीत, नाना पटोलेंचा हल्लाबोल
नाना पटोले: बोलाचीच भात आणि बोलाचीच कढी, असं हे महाराष्ट्रातलं सरकार असल्याची टीका कांग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला एखादा शब्द जर मंत्रीच पाळत नाही तर, मग प्रशासन काय पाळणार? असा सवाल नाना पटोले यांनी केला. ते भंडाऱ्यात बोलत होते.
तीन तिघाडा आणि काम बिघाडा असं या सरकारचं काम आहे. त्यामुळं महाराष्ट्राला याचे मोठ्या प्रमाणात नुकसान भोगावे लागत आहे. सध्या पाऊस नसल्यामुळे सर्वत्र चिंतेचा वातावरण आहे याबाबत सरकारचे अद्याप धोरण ठरलेलं नाही. मात्र, पिण्याचं पाणी आरक्षित केलेल आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत एकही मार्गदर्शन अद्याप सांगितलेलं नाही. हे सरकार स्वतःसाठी जगते आहे. स्वतः शहाणपण करायचं. आपलीचं पाठ आपल्याच हाताने थोपटायची, अशी ही सरकारची भूमिका असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. त्यामुळं पंढरपूरची घटना असो की अन्य कुठलीही घटना असो असे चित्र आपल्याला बघायला मिळते असा टोला नाना पटोले यांनी लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर यात्रेत व्हीआयपी दर्शन बंद केलं असतानाही आमदार चिखलीकर आणि मंत्री गुलाबराव पाटील यांना व्हीआयपी दर्शन देण्यात आलं आणि त्यावर वारकऱ्यांचा संताप बघायला मिळाला. यावरुन देखील नाना पटोलेंनी राज्य सरकारवर टीका केली.
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Comments are closed.