धक्कादायक! मुलीच्या मागे का लागतोस म्हणत 10-12 जणांनी तरुणाला मारहाणीत संपवले, नांदेडमध्ये खळबळ
Nanded Crime: राज्यात गुन्हेगारीनं डोकं वर काढलं आहे. दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, लैंगिक अत्याचार, किरकोळ कारणाने मारहाण, गुंडगिरी, किरकोळ कारणाने होणारे खून वाढले असून राज्यात कायदा सुव्यवस्था शाबूत आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. नांदेडमध्ये मुलीच्या मागे का लागतोस म्हणत 10-12 जणांनी 21 वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहरात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हदगाव पोलिसांनी 10 जणांवर गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे. शेख अराफत असे मृत तरुणाचे नाव आहे. मारहाण करणारे तरुणीचे नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती आहे. (Crime News)
21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास घराजवळील मोकळ्या जागेत बसला असताना दहा बार जणांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्याजवळ असणाऱ्या लाकडानेही मारहाण करत मुलास वाचवण्यासाठीमध्ये पडलेल्या तरुणाच्या आईसही मारहाण केल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
नक्की झाले काय?
आमच्या मुलीच्या मागे लागून त्रास दितोस, तिच्यावर नजर ठेवतोस म्हणत तरुणीच्या 10-12 नातेवाईकांनी 21 वर्षीय तरुणाला लाथा बुक्क्यांनी, लाकडाने मारहाण केली. मुलाला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या आईसही मारहाण केली. नंतर तरुणास चाकूने भोसकून ठार केल्याची घटना हादगाव शहरात घडली आहे. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून हदगाव पोलिसांनी या प्रकरणी 10 जणांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. शेख अराफत असे मृत तरुणाचे नाव आहे. तरुणीच्या नातेवाईकांनीच हा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नाशिकमध्ये अतिक्रमण प्रकरणी तणावपूर्ण शांतता
शहरातील काठे गल्ली (Kathe Galli) परिसरातील वादग्रस्त धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काल नाशिक महानगरपालिकेने हटवले. हिंदू संघटनांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. यावेळी दोन गट आमने-सामने आल्याने नाशिक शहरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत होते. वादग्रस्त धार्मिक स्थळाच्या परिसरातील अतिक्रमण हटवल्याची माहिती नाशिक महानगरपालिकेने (Nashik NMC) दिली आणि प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर हिंदू संघटनांनी सात दिवस आंदोलन स्थगित केल्याचा निर्णय घेतला. मात्र रात्रभरापासून नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरात पोलिसांचा खडा पहारा पाहायला मिळत आहे. सध्याचे वातावरण नियंत्रणात असले तरी देखील काहीसे तणावाचे वातावरण दिसून येत आहे.
हेही वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.