नांदेडमध्ये अघोरी प्रकार, चोरीच्या संशयावरुन दोघांना खाऊ घातला मंतरलेला नागेलीच्या पानाचा विडा
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात जादूटोन्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरीच्या संशयावरुन दोघांना मंतरलेल्या नागेलीच्या पानाचा विडा थंड पाण्यात बुडवून त्यात तांदूळ टाकून खाऊ घालण्यात आला आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात चौघांविरोधात जादुटोना प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाप लेकासह जादूटोना करणाऱ्या भोंदूबाबाचा देखील समावेश आहे.
या अघोरी प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असुन या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. रामा आरोटे यांनी 11 ऑगस्ट रोजी भोंदू बाबांनी दिलेले पानाचे विडे गावातील परमेश्वर कंठीराम राठोड यांना व आणखी (साक्षीदार) एकास खाण्यास दिले. यावेळी विडा खाल्याने परमेश्वर यांच्या शरीराला व मनाला वेदना झाल्या. विडा खाऊ घातल्याचा व्हिडिओ एकाने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे. परमेश्वर कांतीराम राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी जादूटोणा प्रतिबंधक कायदा प्रमाणे मांत्रीक गंगाराम संका कादरी (राहणार जारिकोट) यांच्यासह रामा नारायण आरोटे (वय 55), गंगाधर रामा आरोटे (वय 30), राजू नारायण आरोटे (वय 40 राहणार केरूर) या चौघा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार काळे हे पुढील तपास करीत आहे. या घटनेने बिलोली तालुक्यात खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
दिग्विजयला सोडचिठ्ठी दे, त्या तिघांची वाट लागू दे, स्मशानभूमीत काळी बाहुली, लिंबू आणि चिठ्ठी, कोल्हापुरात कहर!
आणखी वाचा
Comments are closed.