‘मी संन्याशी आहे, लग्न करू शकत नाही, पैसे घेऊन मिटवून…’, जवळपास वर्षभराच्या संबंधानंतर नांदेड

नांदेड: नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात प्रकरण राज्यभर गाजत असताना नांदेडमध्ये (Nanded Crime News) देखील असा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका मठातील महाराजाचा हा कारनामा समोर आला आहे. लग्नाचं आमिष दाखवून एका महाराजाने ४७ वर्षीय महिलेवर अत्याचार (Nanded Crime News) केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी महाराजाला अटक करत गुन्हा दाखल केला आहे. नाशिकनंतर नांदेडमध्ये घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. संत हरीगीर दत्तगीर गिरी महाराज (वय ३८) असं अटक करण्यात आलेल्या महाराजाचं नाव आहे. (Nanded Crime News)

46 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने दिली आहे. भाग्यनगर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून 39 वर्षीय इसमाला अटक केली आहे. मठातील 39 वर्षीय महाराज आणि 46 वर्षीय पीडित महिला यांचे एकमेकांवर प्रेम होते. या प्रेम संबंधातून त्यांची जवळीक वाढली. पण पुढे महाराजाने लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याची पीडित महिलेला जाणीव झाली आणि तिने तक्रार देत गुन्हा नोंदवला. पुढील तपास भाग्यनगर पोलिस करत आहेत. (Nanded Crime News)

नेमकं काय घडलं?

नांदेड शहरातील गाडीपुरा भागात महंत बाळगीर महाराज मठ आहे. या मठाचे संत हरीगीर दत्तगीर गिरी महाराज प्रमुख आहेत. दर पौर्णिमा आणि अमावस्याला भाविक दर्शनासाठी मठात गर्दी करत असतात. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीडित महिला देखील १२ मे २०२५ रोजी मठात दर्शनसाठी गेल्या होत्या. यावेळी महाराज आणि पीडित महिलेशी ओळख झाली. महाराजाने महिलेचा मोबाईल नंबर घेतला, त्यानंतर दोघांमध्ये फोनवर संभाषण सुरु होतं. जून महिन्यात महिलेने महाराजांना गुरु केले होते.

‘मी संन्याशी आहे…’

दरम्यान, ‘माझा वाढदिवस आहे. शुभेच्छा देण्यासाठी तू माझ्या घरी ये’, असं तगादा महाराजाकडून लावला जात होता. शिवाय लग्नाचं आमिष दाखवून महाराजाने महिलेच्या घरी जाऊन शरीर सुखाची मागणी करत अत्याचार केला, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे. लग्नाबाबत विचारणा केल्यानं ‘मी संन्याशी आहे, लग्न करू शकत नाही. पैसे घेऊन प्रकरण मिटवून घे’, अशी धमकी देखील दिली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी कलम ६९, ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला. संशयित आरोपी संत हरीगीर दत्तगीर गिरी महाराज याला अटक करण्यात आली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.