नांदेड बातम्या – झालमुरी खा, देश वाचवा! मोदींच्या वक्तव्याविरोधात शिवसेनेचे अनोखे आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी सोने खरेदी, पेट्रोल-डिझेल, तसेच गॅस व खाद्यतेलाच्या वापराबाबत केलेल्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. नांदेडमध्येही शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन छेडले. शहरातील हनुमान पेठ, वजीराबाद परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने “झालमुरी खा, देश वाचवा” आंदोलन करत नागरिकांना झालमुरीचे वाटप करण्यात आले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख मनोज यादव यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी “नरेंद्र मोदी हाय हाय”, “झालमुरी खा, देश वाचवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी राजेश माने, लालचंद यादव, सुरज पटाले, किरण जाधव, राजू यादव, अंकुर पटेल, भाया शर्मा, किशोर ठाकूर, अनिल राम शिंदे, अशोक वाघरे, शेख अमजद लाला, परवेश खान यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.