नांदेड पोलिसांकडून आत्महत्ये प्रकरणी गटशिक्षण अधिकार्‍यासह चौघाजनांविरूध्द गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मानसिक छळ आणि जाचाला कंटाळून एका प्राथमिक शिक्षकाने आपल्या १० आणि १४ वर्षांच्या दोन निष्पाप मुलांसह गोदावरी नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली होती. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीसांनी वडीलांच्या तक्रारीवरून गटशिक्षण अधिकार्‍यासह चार जनांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील नारायण मोरे असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. आरोपी अधिकार्‍यांकडून सातत्याने होणार्‍या मानसिक त्रासामुळे सुनील मोरे प्रचंड नैराश्यात होते. अखेर काल, १७ जुलै २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास, पुर्णेगाव ते आमदुरा दरम्यान असलेल्या गोदावरी नदीच्या पुलावरून सुनील मोरे यांनी आपली मुलगी सारा (वय १४ वर्षे) आणि मुलगा सुमीत (वय १० वर्षे) या दोघांना सोबत घेऊन नदीच्या पात्रात उडी मारली. तीनही निष्पाप जीवांचा यात जागीच अंत झाला. एकाच कुटुंबातील तीन जणांनी अशा प्रकारे सामूहिक आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

मृत सुनील मोरे यांचे वडील नारायण भुजंगराव मोरे (६३) रा. भोकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी अत्यंत कडक पावले उचलत गुन्हा नोंदवला आहे. मृत सुनील मोरे यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडणार्‍या किसन फोले (गटशिक्षण अधिकारी, हदगाव), सूर्यकांत बाचे (विस्तार अधिकारी, हदगाव), शिवाजी कदम (केन्द्र प्रमुख), दत्ता विश्वंभर पवळे या चौघांविरूध्द मोरे यांना त्यांच्या दोन मुलासह आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे, पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोलक

Comments are closed.