सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले

नांदेड : शहरातील सक्षम ताटे हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. जातीयवादातून झालेल्या या ऑनर किलिंगच्या घटनेनं राज्यभर संतापाची लाट उसळली. नांदेड (Nanded) पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली आहे. मात्र, अटकेत असलेल्या आरोपींपैकी एका आरोपीचे इन्स्टाग्राम अकाउंट अजूनही ‘लाइव्ह’ असल्याचे निदर्शनास आल्यानेही खळबळ उडाली होती. संबंधित अकाउंटचे नाव ‘हिमेश मामीडवार 302’ (हिम्या शूटर) असे असून, या अकाउंटवर आरोपीचे हातात बेड्या घातलेले आणि पोलिसांच्या (Police) हातात हात घातलेले फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. आता, याच प्रकरणावरुन मृत सक्षमच्या आई आणि प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

नांदेडमध्ये काही दिवसांपूर्वी सक्षम ताटे या युवकाची प्रेम संबंधातून हत्या झाली होती. या प्रकरणात दोन पोलीस कर्मचारी हे आरोपी करून त्यांना अटक करा अशी मागणी सक्षमच्या कुटुंबियांनी केली आहे. याच मागणीसाठी आज मृत युवकाच्या आईसह प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने पोलिसांनी तातडीने त्यांना आवरते घेतले त्यामुळे अनर्थ टळला. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही काळ तणाव पसरला होता. यावेळी, स्थानिकांनी पोलीस प्रशसनाविरुद्ध संताप व्यक्त केला.

नेमकं प्रकरण काय?

आचल मामिडवार आणि सक्षम ताटे यांची ओळख 2022 मध्ये झाली. दोघांचे प्रेम घट्ट झाल्यानंतर आंचलच्या कुटुंबाने तिला घरात बंद करून ठेवले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कुटुंबाने सक्षमवर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर प्रकरण हाताळणाऱ्या एका महिला पोलिसाने स्पष्ट सांगितले होते की, दोघांचे नाते हे परस्पर संमतीने आहे, POCSO लागू होत नाही. परंतु आचलच्या कुटुंबाने हे ऐकण्यास पूर्ण नकार देत सक्षमविरुद्ध तक्रार कायम ठेवली. जेव्हा आंचल 18 वर्षांची झाली, तेव्हा तिने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन निवेदन दिले की ती POCSO प्रकरण मागे घ्यायचे आहे, अशी माहिती आता समोर आली होती. सक्षमचे कुटुंब आंबेडकरवादी बौद्ध असून आचलचे कुटुंब पद्मशाली हिंदू आहे. जातभेद आणि प्रतिष्ठा या कारणांमुळे मामिडवार कुटुंब या नात्याला तीव्र विरोध करत होते. या विरोधात त्यांनी सक्षमवर मानसिक दबाव टाकायला सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे मामिडवार कुटुंबाने सक्षमला हिंदू धर्म स्वीकारल्यास नातेसंबंध मान्य करू असे सांगितले होते. सक्षमनेही आचलसाठी धर्मांतर करण्याची तयारी दर्शवली, परंतु कुटुंबाने दाखवलेला स्वीकार हा केवळ नाटक असल्याचे नंतर उघड झाले.

हेही वाचा

नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय

आणखी वाचा

Comments are closed.