विजयकुमार गावित सर्वात भ्रष्ट माणूस, माजी मंत्र्यांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, त्यांची मस्ती उतरा
नंदबार बातम्या: नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते चोर आहेत. कुठल्याही काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला त्रास दिला तर त्यांना माझे नाव सांगा. मी तुमच्यासोबत आहे. त्यामुळे कुणालाच घाबरायचे काम नाही. शिवसेना आणि काँग्रेसचे नेते चोर आहेत, असे विधान माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी केले होते. आता यावरून माजी मंत्री आणि काँग्रेस नेते के. सी. पाडवी (K C Padvi) यांनी डॉ. विजयकुमार गावित यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. डॉ. गावित हे ‘सर्वात भ्रष्ट माणूस’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
के. सी. पाडवी म्हणाले की, फक्त विरोधकांना नव्हे तर त्यांच्यासोबत युती असलेल्या शिवसेनेला आणि काँग्रेसला त्यांनी चोर म्हटलं आहे. निश्चितपणे आमदार महोदय हे माजी मंत्री देखील आहेत. ते माजी मंत्री किती वेळा झाले, किती वर्ष ते सत्तेमध्ये राहिले, हे संपूर्ण जनतेला माहिती आहे. त्यांनी 2004 ते 2009 या काळात आदिवासी खात्यात जो भ्रष्टाचार केला त्यात अजूनही प्रत्येक आश्रम शाळेत साहित्य सडत पडलेले आहे. डॉक्टर गावित यांच्यावर गायकवाड समिती नेमण्यात आलेली आहे. त्यांची केस हायकोर्टात सुरू आहे. त्यांच्यावर सहा हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
हा माणूस भ्रष्टाचार केल्याशिवाय जगूच शकत नाही
के. सी. पाडवी पुढे म्हणाले की, नाशिकमध्ये एका गावाला 200 वस्ती असताना त्यांनी 800 मंगळसूत्र वाटप केलेले आहेत. याबाबतची सर्वांनाच माहिती आहे. हा माणूस भ्रष्टाचार केल्याशिवाय जगूच शकत नाही. भ्रष्टाचार करण्याची त्यांची जी पद्धत आहे नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषदेवर सत्ता असताना तीन खिडक्या योजनेचे नाव त्यासाठी पडले आहे. अजून देखील ते जिल्हा परिषदेवर पुन्हा सत्ता येण्यासाठी भाषण करत फिरत आहेत. काँग्रेस आणि शिवसेना हे चोर आहेत असे म्हणत आहेत. परंतु ते किती चोर आहेत हे संपूर्ण जनतेला माहित आहे.
विजयकुमार गावित सर्वात भ्रष्ट माणूस
डॉ. गावित यांनी आता गायी वाटप केल्या आहेत. त्यात किती भ्रष्टाचार झाला आहे ते सर्वांना माहित आहे. या गायी जिवंत आहेत का नाही? दूध देत आहेत का नाही? हे सर्व जनतेला माहित आहे. त्यांना परत केसमध्ये टाकावे लागणार आहे. त्यांची मस्ती आता उतरावी लागणार आहे. त्यांच्यासारखा भ्रष्टाचारी माणूस या देशात आदिवासींपैकी पहिला आहे, असा घणाघात त्यांनी के. सी. पाडवी यांनी केलाय.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.