मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी महायुतीच्या आमदारांशी बैठकीत संवाद साधला. मोदींच्याहस्ते आज ‘आयएनएस सूरत’, ‘आयएनएस निलगिरी’ या युद्धनौकांचे आणि ‘आयएनएस वाघशीर’ या पाणबुडीचे जलावतरण करण्यात आले. त्यानंतर नेवीच्या आंग्रे सभागृहात पंतप्रधानांनी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधत अनुभवाधारीत मार्गदर्शन केलं. यावेळी, कुटुंबासह मतदारसंघात काळजी घेण्याचं आणि जनतेमध्ये मिसळून काम करण्याचा सल्ला मोदींनी दिला. मोदींच्या मार्गदर्शनानंतर काही आमदारांनी आपला अनुभव सांगताना, बहुमोल मार्गदर्शन लाभल्याचे म्हटले. भाजप आमदार चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी मंत्रमुग्ध झाल्याची प्रतिक्रिया दिली. तर, आजचा दिवस अविस्मिरणीय राहिल्याचे आमदार रमेश बोरनारे आणि संजय शिरसाट यांनी म्हटलं.
पंतप्रधान मोदी आज पालक स्वरुपात होते, नरेंद्र मोदींच्या आजच्या भेटीनं महायुती अधिक मजबुत झालीय. पंतप्रधान मोदींचं बोलणं ऐकुन आज मंत्रमुग्ध झालो, असे चित्रा वाघ यांनी म्हटलं. मोदी बोलत राहावेत आणि आम्ही ऐकत रहावं असं वाटत होतं, जनसेवेचा वसा घेऊन जनसंपर्क वाढवा हा सल्ला त्यांनी पुढे जातांना घराकडेही लक्ष द्या अशा सूचनाही केल्या. दिनचर्या कशी असावी, आरोग्य कसं राहावं, याबाबत पंतप्रधानांनी मार्गदर्शन केलं. पीएमओ जनतेपर्यंत पोहोचवण्यासंदर्भातही त्यांनी मार्गदर्शन केल्याचं चित्रा वाघ यांनी मोदींच्या भेटीनंतर सांगितलं.
आम्ही प्रचंड ऊर्जा घेऊन निघालो – शिरसाट
तर, आजचा दिवस अविस्मिरणीय राहिला, आज मोदींना जवळून पाहता आणि ऐकता आलं. मोदींनी आज जे सांगितले ते खूप महत्वाचं होतं. आज आम्ही धन्य झालो, जनसेवेसोबत सकाळपासून ते रात्रीपर्यत कसं काम करावं, आरोग्यासोबत कुटुंबियांची कशी काळजी घ्यावी हेही मोदींनी सांगितल्याचं आमदार रमेश बोरनारे यांनी म्हटलं. तर, मोदींनी आम्हाला आमची दिनचर्या विचारली. त्यात कुटुंबाला कधी वेळ देतात ते विचारले, योग, आरोग्याचे महत्व सांगितले. आजचा अनुभव अविस्मरणीय होता, महायुती भक्कम आहे. जनसंपर्क कसा वाढवावा हे मोदींनी सांगितले, मोदींनी स्वत: कश्या पद्धतीनं संघर्ष केला हेही सांगितले. त्यामुळे, आज प्रचंड ऊर्जा घेऊन आम्ही निघालो आहोत, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी मोदींच्या भेटीनंतर दिली.
विधानपरिषद आमदारांनी मतदारसंघ दत्तक घ्यावा
राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या, त्यासाठी दरवर्षी स्वतःचं मेडिकल चेकअप करून घ्या. कुटुंबाला वेळ द्या, घरातील पत्नी, मुलगी, आईकडे विशेष लक्ष द्या, कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊन देऊ नका, असा सल्ला मोदींनी दिल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं. तर, योगा किंवा तत्सम व्यायाम करा, मी स्वतः पहाटे उठून दररोज योगा करतो. मतदारसंघात ज्यांनी तुम्हाला मतदान केले नाही, त्यांच्यासाठी काम करुन त्यांच्यासोबत विरोधकांनाही आपलं करुन घेण्याचा प्रयत्न करा. विधानपरिषदेच्या आमदारांनी एखादा मतदारसंघ दत्तक घेत चांगले काम करावे. अधिकाऱ्यांसोबत कामानिमित्त बोलताना नम्रपणे बोला व काम करून घ्या. बदली, दलालीसारख्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा, अधिकाधिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करा, असा सल्ला मोदींनी आमदारांना दिला.
हेही वाचा
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
अधिक पाहा..
Comments are closed.