अरे अरे अरे…काय तुमची किंमत…; इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत, शिंदे गट

उधव ठाकरे: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीधील घटक पक्षांची बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) देखील उपस्थित होते. या बैठकीदरम्यान राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक आयोगासंदर्भातील प्रेझेंटेशन दिलं. यादरम्यानचे काही फोटोही समोर आले आहेत. या फोटोमध्ये उद्धव ठाकरेंसह संजय राऊत, आदित्य ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गट आणि भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.

इंडिया आघाडीची काल (7 ऑगस्ट) राहुल गांधींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीतल्या आसन व्यवस्थेवरून आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने टोलेबाजी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना बैठकीत अखेरच्या रांगेत बसवण्यात आलं असा टोला शिवसेना भाजप नेते मारत आहेत. हिंदुत्व, विचारधारा सोडली की पदरात काय पडलं? शेवटची रांग? असा टोला केशव उपाध्येंनी मारलाय. तर नरेश म्हस्केंनीही एक्स पोस्टवरून खिल्ली उडवली आहे.

नरेश म्हस्के काय म्हणाले?

बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान, स्वाभिमान शिकवला. अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला. तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का?काँग्रेसने तुमची काय ही अवस्था करून ठेवली आहे. तुमच्यापेक्षा एक-एक खासदारवाले पक्ष बरे… त्यांना सुद्धा पुढच्या रांगेत बसवलं… महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवलीत, असं म्हणत नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

भाजपचे केशव उपाध्य काय म्हणाले?

भाजपासोबत उध्दव ठाकरे होते, तेव्हा किती सन्मान उद्धव ठाकरेंना किती सन्मान होता. देशातील भाजपाचे अनेक महत्वाचे नेते मातोश्रीवर जाऊन सन्मान करत होते. 2019 लोकसभा निवडणूकीच्यावेळी अमित शाह मातोश्रीवर आले होते. हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली, त्यातून मान गेला, सन्मान गेला… हातात पडलं काय तर…आता तर काय बैठकीत अपमानाची थेट शेवटची रांग…, असा टोला केशव उपाध्य यांनी लगावला आहे.

ठाकरे-शिंदेंचा वाद दिल्लीतही! Special Report, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=r-lseh7wede

संबंधित बातमी:

Raj Thackeray and Uddhav Thackeray : मोठी बातमी : नाशिकमध्ये मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेची युती, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग

आणखी वाचा

Comments are closed.