नरहरी झिरवळ व्हायरल व्हिडिओ प्रकरणात पहिली कारवाई; ट्रान्सजेंडरच्या भावविरोधात गुन्हा दाखल, नोक

मुंबई: राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला असून, ट्रान्सजेंडरच्या तक्रारीवर कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Narhari Zirwal)

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रान्सजेंडरच्या भावविरोधातच कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अन्न व औषध प्रशासनात (एफडीए) मध्ये नोकरी लावण्याची मागणी केल्याचा अन्यथा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा एफआयआरमध्ये आरोप केला आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ मूळ स्वरूपात नसून तो ‘एडिट’ (Edit) करून किंवा त्यात छेडछाड करून व्हायरल करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. (Narhari Zirwal)

कफ परेड पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ७९ आणि ३५१(१) सह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत (IT Act) गुन्हा दाखल केला आहे. या कलमांनुसार, कोणाच्या तरी गोपनीयतेचा भंग करणे, बदनामीकारक मजकूर पसरवणे आणि धमकावणे यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश होतो. या प्रकरणाचा तपास आता कफ परेड पोलिसांकडून केला जात आहे.

झिरवाळांचा व्हिडीओ व्हायरल

मंत्री नरहळी झिरवाळ यांचा तृथीयपंथीय व्यक्तीसोबतचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हिडिओवरून विरोधकांनी मंत्री झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. परंतु व्हायरल व्हिडिओ दोन-तीन व्हिडिओ जोडून तयार करण्यात आल्याचा आरोप मंत्री नरहळी झिरवाळ यांनी केला आहे. त्यामुळे नरहरी झिरवाळ यांचा तृतीयपंथीयासोबतचा व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे, याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु नरहरी झिरवाळ यांचा व्हिडिओ खरा निघाल्यास कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

तर या प्रकरणी राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासंबंधी व्हायरल होणाऱ्या कथित व्हिडीओवर (Narhari Zirwal Video) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ हा दोन तीन व्हिडीओ एकत्रित जोडून तयार केल्याचा दावा झिरवळांनी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्या व्हिडीओची शाहनिशा केली जाईल, सत्यता तपासली जाईल आणि मग निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक कथित व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावरून झिरवाळांनी राजीनामा द्यावा अशी एक मागणी केली जात आहे. राष्ट्रवादीतील एका गटाने तशी मागणी केल्याची माहिती आहे. तर शिवसनेच्या नेत्यांनीही झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी केली असल्याची माहिती आहे.

आणखी वाचा

Comments are closed.