लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचारी मुंबईला शिफ्ट करणार

नाशिक : लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील नामांकित कंपनीला टाळं लागणार आहे. कंपनीमधील कर्मचाऱ्यांना आता मुबंई, पुण्यातील इतर प्रोजेक्टमध्ये शिफ्ट केलं जाणार असल्याची माहिती आहे. नाशिकमधील धर्मांतर प्रकरण उघडकीस आल्यानंतर कर्मचाऱ्यांना नाशिक युनिटमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना एकतर मुंबई-पुण्याला स्थलांतरित व्हावं लागणार आहे किंवा नवीन नोकरी शोधावी लागणार आहे.

नाशिकमधील एका कंपनीमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर देशभर खळबळ उडाल्याचं चित्र आहे. त्यामुळे या कंपनीने आता नाशिकमधील त्यांचं युनिटच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांवर एकतर मुबंई-पुण्यात स्थलांतरित होण्याची किंवा बेरोजगारी टाळण्यासाठी नविन नोकरी शोधण्याची वेळ आली आहे.

सध्या या कंपनीमध्ये पोलीस तपासाच्या कारणास्तव मोजकेच कर्मचारी येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेचा तपास करण्यासाठी नाशिक पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे. कागदपत्रची तपासणी तसेच इतर माध्यमातून पोलिसाची चौकशी सुरू आहे. कंपनीच्या आवारात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

मोठं रॅकेट असल्याचा संशय

नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडून होण्याची शक्यता आहे. एनआयए, एटीएस आणि सीबीआय या प्रकरणाचा तपास करण्याची शक्यता आहे. SIT कडून प्रकरणाची महत्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवण्यात आली आहे.  लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचा संशय आहे.

लैंगिक शोषण प्रकरणातील तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरूख कुरेशी, शफी शेख, आसीफ शेख हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. तरुणीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारी कंपनीतील महिला अधिकारी अश्विनी चेनानी पोलीस कोठडीत आहे. तर आरोपींच्या गुन्ह्यात सहभागी असणारी निदा खान अद्यापही फरार आहे. पोलीस तिचा शोध घेण्यात अजून तरी अपयशी ठरलेत.

तरुणींचे ब्रेशवॉश

नाशिकच्या एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत उघडकीस आलेले लैंगिक शोषण आणि धर्मांतराचे प्रकरण आता अधिक गडद होत चालले आहे. केवळ लैंगिक शोषणच नाही, तर तरुणींचे पद्धतशीरपणे ब्रेनवॉश करून त्यांचे धर्मांतर करण्याचा मोठा ‘मास्टरगेम’ कंपनीत सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे.

तपासादरम्यान पीडित तरुणीच्या बाबतीत काही अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पीडितेने सलग दोन वर्षे महिना-महिनाभर उपवास पकडण्यास सुरुवात केली होती. हिंदू मैत्रिणींनी तिला जेवणासाठी बोलावले तरी ती स्पष्ट नकार देत असे. धक्कादायक म्हणजे, पीडितेने गेल्या वर्षापासून ‘लिप्स्टिक’ लावणेही पूर्णपणे बंद केले होते. संशयित दानिश हा विवाहित असल्याचे पीडितेला तिच्या टीम लीडरने अनेकदा सांगितले, तिची समजूत काढली. मात्र, संशयितांच्या जाळ्यात अडकलेल्या पीडितेला यावर विश्वासच बसत नव्हता.

ही बातमी वाचा :

आणखी वाचा

Comments are closed.