डुकरं वाचवण्यासाठी 20 मांजरी अन् कुत्र्यांना विष घालून ठार मारलं, नाशिकमधील धक्कादायक प्रकार

नाशिक गुन्हा: नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka) अंबासन गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, ज्यामुळे गावात मोठा संताप आणि घबराट पसरली आहे. गावातील एका डुक्कर पाळणाऱ्या व्यक्तीने रक्षणाच्या नावाखाली गावात फिरणाऱ्या कुत्र्यांना आणि काही मांजरांना विषारी पदार्थ खाऊ घालून ठार केले आहे. यामुळे सुमारे 20 हून अधिक कुत्र्यांचा मृत्यू झाला असून, काही मांजरीही मृत पावल्या आहेत.

गावातील सावता चौक व अंगणवाडी केंद्राजवळ विषारी पदार्थ टाकल्याची माहिती मिळाली आहे. हे पदार्थ कुत्र्यांनी आणि काही मांजरांनी खाताच, काही मिनिटांमध्ये तडफडून मृत्यूमुखी पडले. या धक्कादायक दृश्यामुळे गावकऱ्यांमध्ये मोठा संताप पसरला आहे. विशेष म्हणजे, या परिसरात लहान मुलं खेळत असल्याने, त्यांची सुरक्षा मोठ्या प्रमाणात धोक्यात आली आहे.

संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात

जायखेडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.  या घटनेनंतर गावात भीतीचा वातावरण पसरला आहे, आणि नागरिकांच्या मनात असंतोष आहे. त्याचप्रमाणे, अंगणवाडी परिसरात लहान मुलं खेळत असताना हे विषारी पदार्थ टाकण्यात आले होते, ज्यामुळे त्यांचं जीवन धोक्यात आलं आहे. नागरिकांनी दोषी व्यक्तीला कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

Nashik Crime : मोटारसायकल चोरी करणारा विधिसंघर्षित बालक ताब्यात

दरम्यान, अंबड पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत मोटा रसायकल चोरी करणाऱ्या विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एकूण चार चोरीच्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या बालकाने नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी सिद्धार्थ झनकर (30, रा. इंदिरानगर, नाशिक) यांनी अंबड गावातील पूनम हॉटेल येथून त्यांच्या मालकीची (एमएच 15-सीएच 9271) हीरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल चोरीस गेल्याची अंबड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हेशोध पथकाने तपास सुरू केला होता. तपासादरम्यान एक व्यक्ती शिंपी मंगल कार्यालय, सिडको परिसरात चोरीची मोटारसायकल विक्रीस आणणार असल्याचे गोपनीय माहिती पोलीस अंमलदार सचिन करंजे व अनिल गाढवे यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे सापळा रचून विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोटारसायकलसह चौकशी केली असता, त्याने अंबड, आडगाव, इंदिरानगर (नाशिक) आणि छत्रपती संभाजीनगर येथून सुमारे एक लाख रुपये किमतीच्या एकूण चार मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

मराठा आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर BMC ला खडबडून जाग, तातडीने ‘या’ 10 सुविधा पुरवल्या

आणखी वाचा

Comments are closed.