मोबाईलमध्ये रेकॉर्डींग करून 25 वर्षीय तरूणानं उचललं टोकाचं पाऊल; नाशिकमधील 12 खासगी सावकारांवर
नाशिक: नाशिकमधील सटाणा (Nashik Crime News) तालुक्यामध्ये एका युवकाच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये 12 खासगी सावकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. सलून व्यवसायिक जनार्दन विजय महाले या 25 वर्षीय तरूणाने आत्महत्या (Nashik Crime News) केली होती.आत्महत्येपुर्वी जनार्दन महाले याने खाजगी सावकाराकडून घेतलेले पैसे वेळेवर परत होत नसल्याने त्यांच्याकडून वारंवार धमक्या येऊ लागल्याने आत्महत्या करत असल्याचे स्वःताच्या आवाजात रेकॉर्डींग करून ठेवले होते. या प्रकरणी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया करून मोबाईलची तपासणी केली. त्यानंतर हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मोबाईलमध्ये पोलिसांना (Nashik Crime News) मिळालेल्या जनार्दन यांच्या आवाजातील रेकॉर्डींगमध्ये खाजगी सावकाराकडून घेतलेल्या पैशाचा व त्यांच्या नावाचा उल्लेख आढळून आला आहे, त्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटक करण्यास सुरूवात केली आहे. (Nashik Crime News)
नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकच्या सटाणा तालुक्यात विना परवाना सावकारकीचा व्यवसाय करण्यासह युवकांच्या आत्महतेस कारणीभूत ठरलेल्या 12 हुन अधिक खाजगी सावकारांवर सटाणा पोलिसांनी गुन्हा दाखल करत 8 जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे बागलाण तालुक्यात खाजगी सावकारकी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 15 फेब्रुवारी रोजी सटाणा शहरातील मुख्य महामार्गावरील एका लाॅजमध्ये दहाणे येथील सलून व्यवसायिक जनार्दन विजय महाले या 25 वर्षीय तरूणाने आत्महत्या (Nashik Crime News) केली होती.
आत्महत्येपुर्वी जनार्दन याने खाजगी सावकाराकडून घेतलेले पैसे वेळेवर परत होत नसल्याने त्यांच्याकडून वारंवार धमक्या येऊ लागल्याने आत्महत्या करत असल्याचे स्वःताच्या आवाजात रेकॉर्डींग करून ठेवले होते.या प्रकरणी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया राबवित मोबाईलची तपासणी केली असता धक्कादायक वास्तव पोलिसांच्या हाती लागले. मोबाईल मध्ये पोलिसांना मिळालेल्या जनार्दन यांच्या आवाजातील रेकॉर्डींग मध्ये खाजगी सावकाराकडून घेतलेल्या पैशाचा व त्यांच्या नावाचा उल्लेख आढळून आला. त्यानुसार पोलिसांनी प्राप्त परिस्थिती समजावून घेतली असता.त्यात सत्यता आढळल्याने 12 पैकी 8 खाजगी सावकारांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अनाधिकृत खाजगी सावकारकी करणे व युवकांच्या आत्महतेस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे. दरम्यान, सटाणा शहर व बागलाण तालुक्यात खाजगी सावकारांकडून मानसिक व शारीरिक छळ होत असणाऱ्या व्यक्तींनी पुढे येऊन पोलिसात तक्रार करावी, त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी केले आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.