महिलेच्या अंत्यविधीनंतर अस्थी व रक्षा गायब, सोन्यासाठी चोरी की अघोरी प्रकार? नाशिकमधील घटनेने ख
नाशिक गुन्हा: सटाणा (Satana) तालुक्यातील नामपूर (Nampur) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर राख व अस्थी गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत महिलेचे नातेवाईक रक्षा विसर्जनासाठी जेव्हा स्मशानभूमीत पोहोचले, तेव्हा त्यांना राख व अस्थी गायब असल्याचे लक्षात आले.
सुरेखा दीपक खैरनार (वय ४०) यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर नामपूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता नातेवाईक अस्थी संकलनासाठी स्मशानात गेले असता राख व अस्थी गायब असल्याचे आढळून आले.
चोरीचा प्रकार चोरीचा प्रकार?
राखेत सोन्याचे दागिने असल्यामुळे चोरट्यांनी ही चोरी केली असावी, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. मात्र हा प्रकार केवळ चोरीपुरता मर्यादित आहे की अघोरी कृत्याशी संबंधित आहे? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. हिंदू परंपरेनुसार विवाहित महिलेला अंत्यसंस्कारावेळी दागिने घालण्याची प्रथा आहे, त्यामुळे अनेक वेळा राखेत दागिने सापडतात.
दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी
या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याआधीही अशा घटना घडल्याचा नागरिकांचा आरोप आहे. ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचीही टीका करण्यात येत आहे. स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, संरक्षक भिंतीची उभारणी करावी, नशेखोरी व अघोरी प्रकारांना आळा घालावा तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वडनेरला द्राक्ष उत्पादकाची फसवणूक
दरम्यान, नाशिकमध्ये दिवसेंदिवस फसवणुकीच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. आता चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची तब्बल 15 लाख 18 हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वडनेरभैरव पोलीस ठाण्यात पिंपळगाव येथील व्यापारी अफजल गुलाब मोगल याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. वडनेर भैरव येथील द्राक्ष उत्पादक प्रमोद दत्तात्रय निखाडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार पिंपळगाव येथील व्यापारी अफजल गुलाब मोगल याने तीन ते सहा एप्रिलदरम्यान निखाडे यांच्या वडनेरभैरव शिवारातील द्राक्षबागेतून 244 किंटल 86 किलो द्राक्षे खरेदी केली होती. या द्राक्षांची किंमत 15 लाख 18 हजार 132 रुपये होती आणि सौदा 62 रुपये प्रतिकिलो दराने ठरला होता. या खरेदीच्या बदल्यात मोगल यांनी निखाडे यांना 15 लाख 18 हजारांचे धनादेश दिले होते. मात्र, हे धनादेश बँकेत जमा केल्यानंतर ते न वटल्याने शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर प्रमोद निखाडे यांनी तत्काळ वडनेरभैरव पोलीस ठाण्यात धाव घेऊन व्यापारी अफजल मोगल याच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.