धक्कादायक! मालेगावातील स्मशानभूमीत अघोरी प्रकार, चितेच्या राखेवर फळं, खिळे अन्…; परिसरात खळबळ
नाशिक गुन्हा: नाशिकच्या (Nashik) मालेगाव (Malegaon) येथील श्रीरामनगर स्मशानभूमीत (Shriramnagar Cemetery) अघोरी कृत्य (Black Magic) उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अंत्यविधी झालेल्या महिलेच्या चितेच्या राखेवर दुधी भोपळा सदृश्य फळ ठेवून त्यावर पाच सहा ठिकाणी नागाच्या फणीच्या आकाराचे खिळे टोचून अघोरी प्रकार करण्यात आल्याचे दिसून आले. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील 75 वर्षीय जमुना बापू पाटील या मयत झाल्या. त्याच दिवशी दुपारी साडे तीन वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. तिसऱ्या दिवशी आज सकाळी राख सावडण्याच्या कार्यक्रमासाठी सर्व नातेवाईक स्मशान भूमीत आले असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
चितेच्या राखेवर फळ ठेवत लिंबू, खिळे लावून अघोरी प्रकार
अंत्यविधी झालेल्या महिलेच्या चितेवर दुधी भोपळा सदृश्य फळ ठेवून त्यावर पाच सहा ठिकाणी नागफणी असलेल्या खिळ्यांनी टोचून अघोरी प्रकार करण्यात आल्याचे दिसून आले. आजूबाजूच्या परिसरात त्याच प्रकारच्या वस्तू पडलेल्या बघून याआधी सुद्धा असा धक्कादायक प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे अमरधाममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
रेल्वे खाली आत्महत्या करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी वाचवलं
दरम्यान, रेल्वे खाली आत्महत्या करणाऱ्या तरुणाला रेल्वे पोलिसांनी वाचवले आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकात ही घटना घडली आहे. रेल्वे स्टेशनवर असलेल्या प्लॅटफॉर्म नंबर दोन वरून जाणाऱ्या मालगाडी खाली आत्महत्या करण्याचा तरुण प्रयत्न करत होता. स्टेशन वरील पोलीस हवालदार उगले यांनी रेल्वे ट्रॅकवर उडी घेऊन तरुणाला वाचवले. पोलिसांनी आत्महत्या करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर मित्रांसोबत भांडण झाल्याने आत्महत्या करत असल्याचे कारण या तरुणाने दिले आहे.
https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.