निवडणुकीची चाहूल लागताच मालेगावात खळबळजनक घटना, कोऱ्या करकरीत बनावट 500 रुपयांच्या नोटा जप्त; न


नाशिक गुन्हे: नाशिक ग्रामीण पोलिसांच्या (Nashik Police) कारवाईत मालेगाव (Malegaon) परिसरात 10 लाख रुपयांच्या बनावट चलनी नोटा (Fake Currency) जप्त करण्यात आल्या आहेत. ही मोठी कारवाई मालेगाव तालुका पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील ए-वन सागर हॉटेलसमोर केली. या प्रकरणात मध्य प्रदेशातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, बनावट नोटांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Nashik Crime: गोपनीय माहितीद्वारे सापळा रचून कारवाई

मालेगाव पोलिसांना बुधवारी (दि. 29 ऑक्टोबर) गोपनीय माहिती मिळाली की, काही परप्रांतीय व्यक्ती बनावट चलनी नोटा विक्रीसाठी मुंबई-आग्रा महामार्गावर येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी ए-वन सागर हॉटेलजवळ सापळा रचला. या वेळी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. नाजीर अक्रम मोहम्मद अय्यूब अन्सारी (वय 34, रा. मोमीनपुरा, बुरहानपूर, मध्य प्रदेश), मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी (वय 33, रा. हरीरपुरा, वॉर्ड क्र. 31, बुरहानपूर, मध्य प्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत. दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी 500 रुपयांच्या 2,000 बनावट नोटा (एकूण किंमत 10 लाख रुपये), दोन मोबाईल हँडसेट आणि एक सॅक असा मिळून 10 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Nashik Crime: मौलानाचाही सहभाग; आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा संशय

ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी मोहम्मद जुबेर अन्सारी हा मौलाना असून मदरशांमध्ये शिक्षण देण्याचे कार्य करतो, अशी माहिती समोर येत आहे. बनावट नोटांच्या मागे कोणते नेटवर्क कार्यरत आहे आणि त्या कुठून आणल्या व कुठे विक्रीसाठी नेल्या जात होत्या, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. राज्यात निवडणुकांची चाहूल लागलेली असतानाच बनावट नोटांचा मोठा साठा जप्त झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Nashik Crime: आठ दिवसांची पोलीस कोठडी

या प्रकरणी भारतीय चलन कायदा तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 179, 180 आणि 3(5) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या कालावधीत बनावट चलन रॅकेटचे मूळ आणि जाळे शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत.

Nashik Crime: यांनी केली कारवाई

ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक तेगबीर संधू आणि पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक प्रीती सावंजी, पोलिस उपनिरीक्षक तुषार भदाणे, हवालदार अमोल शिंदे, प्रकाश बनकर, शिपाई गणेश जाधव आणि मोरे यांनी सहभाग घेतला.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Nashik Crime Prakash Londhe: प्रकाश लोंढे टोळीला मोठा दणका; नाशिक पोलिसांकडून थेट मकोका अंतर्गत कारवाई

आणखी वाचा

Comments are closed.