दीड वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी केला दफनविधी; आईला घातपाताचा संशय; नाशिक पोलिसात तक्रार, पोलि

नाशिक गुन्हा: पती-पत्नीच्या वादामुळे वडिलांकडे राहत असणाऱ्या दीड वर्षीय चिमुकलीचा विहिरीत पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.13) नाशिकच्या (Nashik) मखमलाबाद शिवारात घडली होती. बालिकेच्या मृतदेहाचा पित्याने परस्पर दफनविधी केल्यामुळे आईने मुलीचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार केली होती. आता या प्रकरणी चिमुकलीचा मृतदेह पोलिसांनी स्मशानभूमीतून उकरून आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून यात काही आढळले तर कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मखमलाबाद शिवारात दीड वर्षीय चिमुकली आई-वडिलांमध्ये वाद झाल्यानंतर तीच्या वडिलांसोबत वास्तव्यास होती. वडिलांकडे राहत असतानाच चिमुकलीचा सोमवारी विहिरीत पडली होती. यानंतर नातेवाईकांनी तिला बाहेर काढून खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून चिमुकलीला मृत घोषित केले होते.

मुलीच्या आईचा आरोप

बालिकेच्या मृतदेहाचा पित्याने परस्पर दफनविधी केल्यामुळे आईने मुलीचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मुलगी खेळताना विहिरीत पडल्याचा दावा खोटा असल्याचा आरोप आईने केला आहे. मला माहिती न पडता माझ्या सासर लोकांनी माझ्या मुलीला विहिरीत ढकलून दिले. मी तक्रार करेल याच्या धाकापोटी सासरच्या लोकांनी तिचा दफनविधी केला, असेही मुलीच्या आईने म्हटले आहे.

पोलिसांनी मृतदेह काढला उकरून

तर मयत मुलीच्या नातेवाईकांनी म्हटले आहे की, आम्हाला फोन आला की तुमची मुलगी विहिरीत पाय घसरून पडली. आम्हाला वाटत नाही की, एका वर्षाची मुलगी इतकी चालू शकते आणि तिचा पाय घसरून ती विहिरीत पडू शकते. आम्हाला अशी शंका आहे की, मुलीला सासरच्या लोकांनी विहिरीत लोटून दिले. याप्रकरणी आम्हाला न्याय हवा आहे. सासरच्या लोकांनी मुलीचा परस्पर दफनविधी केला, असे त्यांनी म्हटले. यानंतर  महिलेच्या तक्रारीनंतर आणि न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी मृतदेह उकरून जिल्हा रुग्णालयात दाखल आहे.

…तर कारवाई होणार

या प्रकरणी पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी म्हटलंय की, दि. 10 मार्च रोजी एका महिलेने 112 नंबरवर कॉल करून माहिती पुरवली की, तिच्या दीड वर्षाच्या मुलीच्या मृत्यूविषयी तिला संशय आहे. त्यानुसार ती महिला 11 तारखेला पोलीस स्टेशनमध्ये आली. त्यावेळेस तिने सांगितलं की, माझी दीड वर्षाची मुलगी, पती, सासू तसेच काही व्यक्ती शेतामध्ये काम करत होते. त्यावेळेस मुलीचा विहिरीत पडून मृत्यू झाला, याविषयी मला शंका आहे. याबाबत आम्ही अधिक माहिती घेतली असता ही घटना 10 तारखेला दुपारी घडली होती. त्या मुलीच्या वडिलांनी सासू आणि इतर नातेवाईकांनी तत्काळ तिचा तिचा दफनविधी केला होता. मुलीच्या आईने तिच्या मृत्यूविषयी शंका उपस्थित केल्याने तहसीलदार यांच्या समक्ष पंचनामा करून दफन विधी केलेल्या त्या लहान मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार जे काही पुरावे हाती येतील, त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Dada Khindkar Surrender: धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकर पोलिस अधीक्षक कार्यालयात शरण; तरूणाला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अधिक पाहा..

Comments are closed.