बेंचवर बसण्यावरुनचं भांडण टोकाला गेलं, अल्पवयीन मुलांनी आपल्याच मित्राचा काढला काटा, नाशिक हादर
नाशिक गुन्हा: नाशिकमधील सातपूर (Satpur) भागात एका खाजगी क्लासमध्ये बेंचवर बसण्यावरून झालेल्या वादातून दहावीच्या विद्यार्थ्याची क्लासमधील दोन अल्पवयीन मित्रांनीच मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यशराज गांगुर्डे असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. (Nashik Crime News)
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी यशराज आणि क्लासमधील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये केवळ बेंचवर बसण्याच्या कारणावरून वाद झाला होता. हा वाद तिथेच थांबला नाही. याच वादातून क्लासच्या आवारात तिघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि यशराजला दोघांनी मिळून बेदम मारहाण केली.
मारहाणीत अल्पवयीन मुलाचा मृत्यू
दोन्ही अल्पवयीन मित्रांनी यशराजला लाथाबुक्क्यांनी आणि हाताच्या चापट्यांनी जबरदस्त मारहाण केली. ही मारहाण इतकी गंभीर होती की यशराज जागीच कोसळला. तत्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन तपास सुरू केला आहे. ही घटना घडताच सातपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Nashik Crime : मालेगावमध्ये तरुणाची हत्या
दरम्यान, (दि.1) ऑगस्ट रोजी मालेगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. मागील भांडणाच्या वादातून रस्त्यावर दुचाकी सुरू करत असलेल्या 25 वर्षीय तरुणावर तिघा हल्लेखोरांनी लाकडी दांडक्याने व चाकूने सपासप वार करीत त्याचा निघृण खून केला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाच्या डोक्यावर दगड टाकून हल्लेखोर फरार झाले होते. जुना आग्रा रोडवर, सुझुकी शोरूमसमोर हा प्रकार घडला होता.
खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शहरातील आयशानगर भागातील जय भीमनगरात राहणारा नितीन अर्जुन निकम उर्फ रितिक (25) हा तरुण मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास जुना आग्रा महामार्गावरील सुझुकी शोरूम लगत रस्त्यावर आपली दुचाकी सुरू करत असताना, पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघा तरुणांनी बेसावध असलेल्या नितीनवर लाकडी दांडक्याने व धारदार चाकूने सपासप वार करण्यास प्रारंभ केला. या हल्ल्यात गंभीरित्या जखमी झालेल्या नितीन रस्त्यावर पडला असता हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर मोठे दगड टाकल्याने तो जागीच गतप्राण झाला. नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहताच तिघे हल्लेखोर दुचाकी वरून आरडाओरड करत फरार झाल्याचे परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
वाल्मिक कराड दैवत, धनंजय मुडेंना टार्गेट करु नका, फरार गोट्या गित्तेचा व्हिडीओ व्हायरल
आणखी वाचा
Comments are closed.