नाशकात काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर

नाशिक गुन्हा: राज्यभरात गुन्हेगारीने कळस गाठलाय .नाशिक शहरात रंगपंचमीच्या दिवशी दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच नाशिकमधील आणखी एका राड्याचा व्हिडिओ समोर आलाय .सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल व्यवसायिकांना थोडक्याने लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली . नाशिक शहरात सुरू असणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी नाशिककरांमध्ये सध्या चांगलंच भीतीचं वातावरण आहे .गेल्या तीन महिन्यात नाशिकमध्ये 8 ते 10 खूनाच्या घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे . (Nashik Crime)

काय घडले नक्की?

दुहेरी खुनातील आरोपींना अटक होत नाही तोच नाशिक मधील आणखी एक राड्याचा व्हिडिओ समोर आलाय .सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल व्यवसायिकांना टोळक्याने लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस झाली .हॉटेल समोरील पान टपरी चालकांकडून वस्तू खरेदी करून पैसे न दिल्याने जाब विचारला असता टोळक्याने मारहाण केल्याची पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे .मागील भांडण्याची कुरापत काढून मारहाण केल्याचा पोलिसांना संशय असून शहरात सुरू असलेल्या गुन्हेगारी घटनांनी नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण आहे . (Viral)

रंगपंचमीच्या दिवशी दुहेरी हत्याकांडानं नाशिक हादरलं!

नाशिक शहरात बुधवारी (दि.19) दिवसभर रंगपंचमीचा (Rangapanchami) उत्साह दिसून आला. मात्र, रात्री दुहेरी हत्याकांडाने नाशिक हादरले आहे. उपनगर (Upnagar) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकरवाडी (Ambedkarwadi) येथे दोघा सख्ख्या भावांचा टोकळ्यांकडून धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून या प्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. खून करण्याआधी काय घडले होते? याचा पोलीस तपास करत आहेत. संशयित आरोपींची सध्या कसून चौकशी सुरू आहे.

हेही वाचा:

Nashik Crime : धक्कादायक! मालेगावातील स्मशानभूमीत अघोरी प्रकार, चितेच्या राखेवर फळं, खिळे अन्…; परिसरात खळबळ

अधिक पाहा..

Comments are closed.