कौटुंबिक वाद की प्रेम संबंध? 16 वर्षीय विद्यार्थिनीने होस्टेलमध्ये संपवलं जीवन, दोन महिन्यांपूर
नाशिक: नाशिकच्या शरणपूर रोड येथील तिबेटीयन मार्केट जवळ असलेल्या एका खाजगी हॉस्टेलमध्ये एक धक्कादायक (Nashik Crime News) घटना घडली आहे. हॉस्टेलमध्ये राहत्या खोलीत गळफास (Nashik Crime News) घेत एका 16 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोळा वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल का उचललं याबाबतचा तपास पोलिस करत आहे. ही तरुणी मुळशी अहिल्यानगरची रहिवाशी होती. गेल्या दोन महिन्यापासून ती नाशिकच्या एका खाजगी होस्टेलमध्ये राहत होती. मागील दोन महिन्यांपासून ती या ठिकाणी राहत होती. (Nashik Crime News)
पंख्याला ओढणी बांधली…
तिने नीटच्या परीक्षेसाठी शहरात एका खासगी क्लासमध्ये प्रवेश घेतला होता. तसेच ती अकरावीच्या वर्गात विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शरणपूर येथील तिबेटियन मार्केटजवळ गौरव पार्क नावाची इमारत आहे. येथे फ्लॅटमध्ये मुलींसाठी असलेल्या वसतीगृहात ती अल्पवयीन मुलगी राहत होती. हिने पंख्याला ओढणी बांधली आणि गळफास घेतल्याचे आढळून आले. ही बाब लक्षात येताच अन्य विद्यार्थिनींनी व होस्टेल मालकाच्या मदतीने तिला बेशुद्धावस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून ज्ञानेश्वरीला मृत घोषित केले. तिच्या आत्महत्येमागील कारण समोर आलेले नाही. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद सरकारवाडा पोलिसांनी केली आहे. (Nashik Crime News)
मात्र, या अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल का उचललं याबाबत सखोल तपास सुरू आहे, तिच्या जीवन संपवण्यामागे कौटुंबिक वाद की प्रेम संबंध अशी कोणती गोष्ट आहे का? या अल्पवयीन मुलीची आत्महत्या झाली याचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे, दरम्यान या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. ही तरुणी मुळशी अहिल्यानगर ची रहिवाशी होती. गेल्या दोन महिन्यापासून ती नाशिकच्या एका खाजगी होस्टेलमध्ये राहत होती. मागील दोन महिन्यांपासून ती या ठिकाणी राहत होती. (Nashik Crime News)
आणखी वाचा
Comments are closed.