अशोक खरातच्या विकृत कारनाम्यांचा 160 जीबी डेटा, प्रत्येक पुराव्याला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल ‘ए

नाशिक : नाशिकमधील भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात काल (गुरुवारी, ता ९) काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अशोक खरात विरोधात पुरावे संकलित करण्याच्या कामाने वेग घेतला आहे. अशोक खरातच्या (Ashok Kharat) तपासात तब्बल १६० GB डिजिटल पुरावे तपास यंत्रणांनी गोळा केल्याची माहिती समोर आली आहे. डिजिटल पुराव्यातून खरातच्या काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड होणार आहे. फॉरेन्सिक अहवाल एसआयटी (SIT)कडे सादर केल्यानंतर आता तपासाला आणखी वेग आला आहे. एकूण ४ डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण झाली आहे. पुराव्यांमुळे खरातभोवतीचा कारवाईचा फास अधिक घट्ट झाला आहे. प्रत्येक पुराव्याला A, B, C कोडवर्ड, ‘A’ मध्ये लैंगिक अत्याचाराचे गंभीर संकेत दिले आहे. नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 कालावधीतील हालचालींचा तपशील हा कॅनडा कॉर्नर कार्यालयातून जप्त करण्यात आला आहे. (Ashok Kharat)

अशोक खरात: तबल १६० जीबी डिजिटल पुरावे तपस

32GB क्षमतेचे तसेच 19 फोल्डर डेटा असणारे  3 पेन ड्राईव्ह तसेच 64GB क्षमतेचे OTG पेन ड्राइव्ह आणि लॅपटॉपसह सर्व डेटा SIT कडून स्कॅन करण्यात येत आहे. फोरेन्सिक आणि सायबर टीम कडून सबळ डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. न्यायालयात पुरावे सादर करण्यासाठी एसआयटी (SIT)ने साक्षीदार आणि पिढीताचे जबाबही नोंदविण्यात आले आहे.  वेगवेगळ्या अशा एकूण १६० जीबीच्या डिजिटल पुराव्यांमध्ये खरातचे हे काळे कारनामे दडले असून, खरातच्या गळ्याभोवतीचा फास या पुराव्यांमुळे घट्ट झाला आहे.

Ashok Kharat: डिजिटल पुराव्यावर पोलिसांनी ए, बी, सी नावाचे कोडवर्ड

तपासणीदरम्यान प्रत्येक डिजिटल पुराव्यावर पोलिसांनी ए, बी, सी नावाचे कोडवर्ड दिले असून, त्यात ए म्हणजे खरातने केलेल्या लैंगिक अत्याचाराचे पुरावे असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत कॅनडा कॉर्नर येथील खरातच्या कार्यालयात केले गेलेले काळे कारनामे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत.

Ashok Kharat: खरातला तिसऱ्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलिस कोठडी

भोंदू अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलिस कोठडी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने काल सुनावली आहे. गुरुवारी (दि.९) झालेल्या सुनावणीत खरातने पीडितेला कसे आपल्या जाळ्यात ओढले, हे सांगताना खरातने तुला मुलगाच होईल, असे सांगत गर्भवतीला संबंध ठेवायला भाग पडल्याचा आरोप वकिलांनी केला. त्यानंतर न्यायालयाने खरातला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.