भाजप नेते सुनील बागुलांचा कट्टर समर्थक गोत्यात, 57 लाखांच्या खंडणीचा गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण


नाशिक: भाजपचे सुनील बागुल (Sunil Bagul) यांचे कट्टर समर्थक बाळासाहेब पाठक यांच्यावरही खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल (Ajay Bagul) आणि मामा राजवाडे (Mama Rajwade) यांच्यानंतर श्रमिक सेनेचे बाळासाहेब पाठकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करून हत्यारांचा धाक दाखवून ५७ लाख रुपयांची खंडणी उकळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब पाठक, अजय बागुल आणि मामा राजवाडे (Mama Rajwade) यांच्यासह इतर बारा ते पंधरा जणांवर म्हसरूळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी उकळ्याच्या प्रकरणात बाळासाहेब पाठकसह इतर बारा ते पंधरा जणांचा पोलिसांकडून शोध सुरू असून मामा राजवाडे आणि अजय बागुल हे दोघे  गंगापूर येथील गोळीबार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे.

भाजपचे सुनील बागुल यांच्या आणखी एक कट्टर समर्थकावर पंचवटीतील रासबिहारी-मेरी लिंकरोडवरील कोट्यवधी रुपयाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करून मूर्तिकार मालमत्ताधारकाला हत्यारांचा धाक दाखवून ५७ लाख रुपयांची खंडणी उकळ्याच्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनाप्रणीत श्रमिक रिक्षा चालक-मालक युनियनचे कार्याध्यक्ष भगवंत ऊर्फ बाळासाहेब पाठक याच्यावर म्हसरूळ पोलिसात  गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे याच गुन्ह्यात सुनील बागुलांचा पुतण्या अजय व कट्टर समर्थक मामा राजवाडे यांचेही नाव नमूद आहे. अजय बागुल आणि मामा राजवाडे हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहे मात्र बाळासाहेब पाठक आणि इतर बारा ते पंधरा जणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Ajay Bagul: भाजपच्या सुनील बागुलांच्या पुतण्याला अटक

याआधीच भाजप नेते व शिवसेनेचे तत्कालीन नाशिक जिल्हाप्रमुख सुनील बागुल यांचे कट्टर समर्थक असलेले मामा ऊर्फ बाबासाहेब राजवाडे व पुतण्या अजय बागुल विसेमळा गोळीबार कांडानंतर अडचणीमध्ये सापडले आहेत. आता सुनील बागुलांचा अतिनिष्ठावान भगवंत खंडणीसह गंभीर गुन्ह्यात सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

गंगापूरच्या विसे मळा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी (Nashik Police) मोठी कारवाई करत भाजप नेते सुनील बागूल (Sunil Bagul) यांचा पुतण्या अजय बागूल (Ajay Bagul), पप्पू जाधव व एका अन्य आरोपीला अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणी मामा वाल्मिक उर्फ बाबासाहेब राजवाडे (Mama Rajwade) आणि इतरांना अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरीसा हे अद्यापही फरार आहेत. विसे मळा गोळीबारप्रकरणी अटकेत असलेले भाजप नेते सुनील बागूल यांचे समर्थक मामा राजवाडे आणि अमोल पाटील या दोघांना काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने अटक केली होती.

Ajay Bagul Arrested: अजय बागुलच्या मुसक्या आवळल्या

तर या प्रकरणात भाजप नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल हा फरार होता. पोलीसांकडून अजय बागुल शोध घेतला जात होता. अखेर अजय बागुलच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. अजय बागुल, पप्पू जाधवसह एकास नाशिक पोलिसांनी अटक केली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.