बापानेच पोटच्या पोराचा गळा दाबला, 9 वर्षीय मुलाचा मृतदेह गोणीत भरून सासूरवाडीत फेकला, नाशिक हाद

नाशिक गुन्हा: नाशिक शहरात बाप मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या आम्रपाली परिसरात एका वडिलाने रागाच्या भरात आपल्या  9 वर्षांच्या मुलाची गळा आवळून निर्घृण हत्या केली आहे. एवढंच नाही तर बापाने हत्येनंतर मुलाचा मृतदेह गोणीत टाकून सासूरवाडीला नेत पलंगावर टाकल्याची प्राथमिक माहिती मिळालीय. या संतापजनक घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. सुमित पुजारी असे मुलाच्या वडिलांचे नाव आहे. या घटनेनंतर  नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपासासाठी नाशिक गुन्हे शाखेचे शोध पथक रवाना झाल्याची माहिती आहे. (Nashik Crime News)  नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशी ही हत्येची घटना समोर आलीय.

नक्की घडले काय?

नाशिकमध्ये अतिशय थंड काळजाने बापाने आपल्या नऊ वर्षांच्या मुलाला गळा आवळत संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. हत्येनंतर मुलाला गोणीत भरत सासूरवाडीला नेत तिथल्या पलंगावर टाकून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. या  घटनेमुळे संपूर्ण नाशिक हादरले आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आणि नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.उपनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून सध्या सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचं समोर आलं आहे. सुमित पुजारी (वय 35) असे आरोपी वडिलाचे नाव असून त्यांनी आपल्या मुलगा गणेश पुजारी याची हत्या केली. कौटुंबिक वादातून झालेल्या वादानंतर रागाच्या भरात सुमित यांनी स्वतःच्या मुलाचा गळा आवळून त्याचा जीव घेतला.

प्राथमिक माहितीनुसार, घरात सतत वादाचे वातावरण होते. सुमित पुजारी हे काही दिवसांपासून तणावाखाली असल्याचे समोर आले. कौटुंबिक कलह वाढल्याने पोटच्या पोराचा गळा घोटत त्याला ठार केल्याचं समोर आलं आहे. नक्की काय वाद झाला? कौटुंबिक वाद किती गंभीर होता? आणि इतक्या टोकाचं पाऊल उचलण्यामागचं नेमकं सत्य काय आहे? हे सर्व तपासानंतरच स्पष्ट होईल. दरम्यान या घटनेच्या तपासासाठी नाशिक गुन्हे शाखेचे एक शोधपथक घटनास्थळी रवाना झालं आहे. नाशिकमधून सलग दुसऱ्या दिवशी ही हत्येची घटना समोर आल्याने संपूर्ण शहरात खळबळ आहे. मुलाच्या मृत्यूने कुटुंबीय सुन्न झाले आहेत.

हेही वाचा:

कन्यादान केलं, लेकीच्या डोक्यावर अक्षताही पडल्या; लग्नमंडपातच वडिलांना ह्रदयविकाराचा झटका, गाव हळहळलं

https://www.youtube.com/watch?v=tqyzv-dvpie

अधिक पाहा..

Comments are closed.