नाशिकच्या पंचवटीत टोळीयुद्धा! जुन्या वादातून दोन गटात राडा, गोळीबाराच्या घटनेनं शहर हादरलं!

नाशिक गुन्हेगारी बातम्या: नाशिकच्या गुन्हेगारी विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे? यात नाशिकच्या पंचवटी येथील फुलेनगर परिसरात काल (22 जुलै) मध्यरात्री दोन टोळ्यांमध्ये तुफान राडा झाला. त्यात एकमेकांच्या दिशेने बाटल्या, दगड आणि काठ्या भिरकवण्यात आल्या. यात विनोद वाघ याने रोहित्या टोळीच्या दिशेने गोळीबार केला. यात कोणीही जखमी झाले नसले तरी या राड्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सांगितले. मात्र

पुढे आलेल्या माहितीनुसारयात दहा ते बारा जणांवर पंचवटी पोघेतलेसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सर्व सराईत गुन्हेगार असून प्रत्येकावर पाच ते सहा गंभीर गुन्हे दाखल आहे. गुन्ह्यातील दोघे हद्दपार असूनही शहरात वावरत असताना गुन्हा केला असून पोघेतलेएस यातील सर्वाचा शोध घेत आहे. मात्र पंचवटीतील टोळी युद्धामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचवटी पोलीसांनी दोन पथके तयार केली असून फरार असलेल्याच्या मागावर असल्याची माहिती पंचवटी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ यांनी दिली?

चाळीसगावच्या कोदगाव बायपासवर भीषण अपघात; दोन जण जागीच ठार!

जळगावच्या चाळीसगाव शहरातील कोदगाव बायपास चौफुलीवर पिकअप आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सुदाम पवार व श्रावण माळी या दोघांचा जागीच मृत्यू झाला. धडकेनंतर पिकअप उलटली तर दुचाकीचा चक्काचूर झाला. या घटनेमुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमित मनेळ यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, पिकअप चालक अपघातानंतर पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

लग्नाचं आमिष दाखवीत दोन वर्षापासून शारीरिक संबंध; पीडित तरुणीची आत्महत्या

भंडाऱ्याच्या तुमसर येथील एका तरुणांनं नागपूरच्या एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचं आमिष दाखवीत तिच्याशी दोन वर्षापासून शारीरिक संबंध ठेवलेत. मात्र, संबंधित तरुणानं लग्न न करता तिला घरातही स्थान दिलं नाही. या विवंचनेतून 18 वर्षीय तरुणीनं विष प्राशन करुन तुमसरातील एका तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. मृत तरुणीच्या बहिणीच्या तक्रारीवरुन तुमसर पोलिसांनी तरुणासह त्याच्या आईवडील अशा तिघांविरुद्ध आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रिन्स मेश्राम (२२), वडील – भजनलाल मेश्राम (४८) आई – रागिनी मेश्राम (४०) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तपास सहायक पोलिस निरीक्षक विलास मुंडे करीत आहेत.

आणखी वाचा

आणखी वाचा

Comments are closed.