त्र्यंबक रोडवरील रिसॉर्टमध्ये रंगायच्या पार्ट्या, आरोपी तिथेच ओढायचे मुलींना जाळ्यात, नाशिक धर्
नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमधील (Nashik) नामांकित आयटी कंपनीतील (IT Company) लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणाचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती आता अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील ‘हॉटेल आनंद रिसॉर्ट’ येथे या प्रकरणातील संशयित आरोपी रात्री उशिरापर्यंत पार्ट्या करत असल्याचे समोर आले असून, SIT ने या हॉटेलची झाडाझडती घेतली आहे.
Nashik Crime News: हॉटेलचे रेकॉर्ड आणि रजिस्टर ताब्यात
SIT ने आनंद रिसॉर्टवर छापा टाकत तिथली महत्त्वाची कागदपत्रे आणि गेस्ट रजिस्टर आपल्या ताब्यात घेतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 2022 ते 2023 या कालावधीत या ठिकाणी सातत्याने पार्ट्यांचे आयोजन केले जात होते. केवळ पार्टी हॉलच नव्हे, तर हॉटेलमधील रूम्सदेखील मोठ्या प्रमाणावर बुक केल्या जात असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. यावरून या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
Nashik Crime News: पार्ट्यांच्या आडून मुलींना ‘फूस’
तपासात समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, याच रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांमध्ये कंपनीतील हिंदू मुलींना बोलावले जात असे. या प्रकरणातील अटक करण्यात आलेले संशयित आरोपी या पार्ट्यांमध्ये मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी विविध प्रकारची प्रलोभने आणि फूस लावत असत. याच ठिकाणाहून धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचे षडयंत्र रचले गेल्याचा संशय बळावला आहे.
Nashik Crime News: हॉटेल कर्मचाऱ्यांची कसून चौकशी
SIT च्या पथकाने हॉटेल व्यवस्थापन आणि तेथील कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली आहे. या पार्ट्यांसाठी कोणाच्या नावाने बुकिंग व्हायचे, पार्ट्यांचे स्वरूप काय असायचे आणि तिथे नेमके कोण-कोण उपस्थित असायचे, याची माहिती कर्मचारी आणि रजिस्टरमधून गोळा केली जात आहे.
Nashik Crime News: संशयित आरोपींना पुन्हा ताब्यात घेण्याची शक्यता
या रिसॉर्टमधील पुराव्यांमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे, सध्या अटकेत असलेल्या किंवा जामिनावर असलेल्या संशयित आरोपींना SIT आज पुन्हा ताब्यात घेण्याची शक्यता आहे. या पार्ट्यांच्या माध्यमातून आणखी किती मुलींचे शोषण झाले, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.