भर रस्त्यात तरुणीला मारहाण करत ठार मारण्याची धमकी; सलग दोन दिवसात दोन घटनांनी नाशिक हादरलं!

नाशिक गुन्हेगारी बातम्या: प्रियसीचे नात्यातीलच दुसऱ्या मुलाशी प्रेम संबंध असल्याच्या संशाने प्रियकराने चाकू हल्ल्या (Crime News) केल्याची घटना ताजी असताना, दुसऱ्याच दिवशी गंगापूर रोडवर एका तरुणाने तरुणीचा पाठलाग करत तिला मारहाण करून जिवानिशी ठार मारण्याची धमकी दिली आहे. गंगापूर रोडवरील एका महाविद्यालयाच्या परिसरात हा प्रकार काल (11 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास घडला असून संशयताच्या विरोधात नाशिकच्या सरकार वडा पोलीस (Nashik Police) ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलग दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये मारहाण करत धमकीचा प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 19 वर्षे तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार ती कॉलेजला जात असताना शालेय मित्र अभिजीत तुपसुंदर हा तिच्या मागे आला आणि तिला अडवून तुझ्यासोबत बोलायचे आहे, असे बोलू लागला. दरम्यान, त्याने तरुणीचा डावा हात पकडून तिला जोरजोरात ओढत मारहाण केली. या मुलीला तिच्या मैत्रिणीने वाचवण्याचा प्रयत्न केला असता अभिजीतने तिलाही शिवीगाळ करत तू पोलीस तक्रार केली तर तुला जीवे ठार मारेल, अशी धमकी देऊ तो त्या ठिकाणाहून पळून गेला.

विनयभंगाचा गुन्हा दाखल

अशातच भयभीत झालेल्या युवतीने पोलिसात धाव घेऊन घडलेल्या सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.  दरम्यान सरकार वाडा पोलिसांकडून या घटनेची नोंद करत संशयीतावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र नाशिक शहरात वारंवार या घटना घडत असून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सर्वाधिक वाढ होत असल्याने आता नाशिक शहर पोलिसांवर टीकेची झोड उठत आहेत. तर या प्रकरणानंतर  महाविद्यालय परिसरात पोलिसांचे पेट्रोलिंग वाढवण्यात आले असून गुन्हेगारांवर कठोर शासन केलं जाईल, अशी माहिती
सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांनी दिली आहे.

पंचवटी परिसरात अज्ञात इसमाचा आढळला मृतदेह, पोलिसांना घातपाताचा संशय

नाशिकच्या पंचवटी परिसरातील एरंडवाडी येथे एका 40 वर्षीय इसमाचा भर वस्तीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. त्यासोबत श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथक देखील घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी पंचनामा सुरू केला. मृतदेह जवळ दारूची बाटली आणि ग्लास पोलिसांना मिळून आले असून डोक्यावर जबर मार लागल्याने घातपात असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, मृतदेह नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. यासंदर्भात पंचवटी पोलीस अधीक्षक तपास करत आहेत.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.