नाशिकच्या नामांकित कंपनीत भयानक कांड, आधी नोकरी द्यायचे मग रिसॉर्टवर नेऊन…; 9 गुन्हे दाखल, ने
नाशिक क्राईम न्यूज : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये धक्कादायक वाढ झाली असून, आता एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी (IT) कंपनीतील संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले असून, याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.
Nashik Crime News: अशोक खरात, रवींद्र एरंडेनंतर तिसरे मोठे प्रकरण
नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याने भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर रवींद्र एरंडे याने महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून त्यांना धमकावल्याची घटना ताजी असतानाच, आता कॉर्पोरेट क्षेत्रातील हे तिसरे मोठे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
Nashik Crime News: नेमकी घटना काय?
नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. आरोपींनी नोकरीचे आमिष दाखवून आणि नंतर ‘माझ्यामुळेच तुला नोकरी मिळाली’ असे उपकाराचे ओझे टाकून महिलांना जाळ्यात ओढले. पीडितेच्या तक्रारीनुसार, सुट्टीच्या दिवशी तिला एका रिसॉर्टवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला.
कामाच्या ठिकाणी महिलांच्या अवयवांकडे पाहून अश्लील हावभाव करणे आणि त्यांच्या धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणे, असे प्रकार तिथे सुरू होते. केवळ महिलाच नव्हे, तर एका तरुण कर्मचाऱ्याला देखील धर्मांतरासाठी भाग पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला आहे.
Nashik Crime News: तब्बल 9 गुन्हे दाखल; पाच जणांना बेड्या
या संवेदनशील प्रकरणात शहर पोलिसांनी अत्यंत गोपनीयता पाळत तपास केला. 25 मार्च रोजी देवळाली कॅम्प येथे पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर, 2 आणि 3 एप्रिल रोजी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आणखी 8 गुन्हे नोंदवण्यात आले. पोलिसांनी आतापर्यंत आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन आणि तौसिफ अत्तार या पाच संशयितांना अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Nashik Crime News: पोलिसांचा तपास सुरू
नोकरीच्या मुलाखतीपासूनच महिलांना लक्ष्य करण्याची ही पद्धत अत्यंत गंभीर असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे आणि किती महिला या शोषणाला बळी पडल्या आहेत, याचा कसून तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.