तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत शरीरसंबंध ठेवले, लग्नाला नकार; नाशिकच्या पोलीस अंमलदारावर आयुक्त
नाशिक गुन्हा: नाशिक शहर पोलीस दलातील दंगल नियंत्रण पथकाच्या (आरसीपी) अंमलदारावर प्रेमसंबंध ठेवून विवाहाचे आमिष दाखवत विवाहित तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा आणि नंतर तिच्या पतीसह तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी अंमलदाराला अटक केली आहे. (Nashik Crime News)
अभी उर्फ चंद्रकांत शंकर दळवी (35, रा. कितकीनगर, म्हसरूळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, तो सध्या शहर पोलीस आयुक्तालयाच्या आरसीपी पथकात कार्यरत होता. या प्रकरणी पाथर्डी फाटा परिसरातील 25 वर्षीय विवाहित तरुणीने इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
विवाहित तरुणीवर वारंवार बलात्कार
याबाबत अधिक माहिती अशी की, पेशाने पोलीस अंमलदार असलेल्या चंद्रकांत दळवी याने 2020 ते 23 मे 2025 या कालावधीत तिच्याशी जवळीक साधून वेगवेगळ्या लॉजमध्ये नेऊन अत्याचार केला. राणेनगर येथील ‘कशिश लॉज’, सातपूर येथील ‘सिटाडेल’ आणि डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील लॉजमधील प्रकारांचा तक्रारीत उल्लेख आहे.
प्रेमाच्या नावाखाली जवळीक साधून, ‘लग्न करतो’ असे म्हणत तिचा विश्वास संपादन करण्यात आला. त्याचे लग्न झालेले असताना वैदीक पद्धतीने लग्न करत तरुणीला घरी घेऊन न जाता तिची फसवणूक केली. तसेच तरुणीचे लग्न झाल्यानंतर तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत तरुणीचे अश्लील फोटो सोशल मिडियावर व्हायरल केले. या प्रकरणी दळवी विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलीस अंमलदारावर मोठी कारवाई
विशेष म्हणजे, आरोपीने याआधी पोलिसाच्या वर्दीत अनेक रील्सदेखील तयार करून इंस्टाग्राम व फेसबुकवर पोस्ट केल्या असून, सोशल मीडियावर त्याचे मोठे फॉलोइंग आहे. त्यामुळे तो कायम चर्चेत असायचा. आता त्याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक हे संशयित आरोपी पोलिस अंमलदार अभी दळवीच्या विरोधात कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या गुन्ह्याची दखल घेत पोलिस आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दळवीला शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
बीड गुन्हा: आपला # %नाही … सॅटिसेम्सची ऑडिओ क्लिप
अधिक पाहा..
Comments are closed.